शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श गावाची निर्मिती थोरांच्या विचारातून व स्वत:च्या कृतीतून साध्य करा

By admin | Updated: November 18, 2015 01:11 IST

आपलं घर, आपला गाव, आपला समाज, आपणच पुढे नेवू शकतो. ती धमक व ताकद आपल्यात आहे.

चंदू पाटील मारकवार : बिबी येथे स्वच्छता अभियान व सत्कार सोहळानांदाफाटा : आपलं घर, आपला गाव, आपला समाज, आपणच पुढे नेवू शकतो. ती धमक व ताकद आपल्यात आहे. त्यासाठी थोरांच्या विचारातून व स्वत:च्या कृतीतून आदर्श गावाची निर्मिती करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आदर्श गाव राजगडचे माजी सरपंच चंदू पाटील मारकवार यांनी केले. ते बिबी येथे समाजसेवक डॉ. गिरीधर काळे सामाजिक संस्था, सेवार्थ ग्रुप व साई स्पोर्टिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता मोहीम व सत्कार सोहळ्यात शुक्रवारी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच इंदिरा कोडापे होत्या. स्वागताध्यक्ष डॉ.गजानन काकडे, विशेष अतिथी समाजसेवक डॉ.गिरीधर काळे, संजय पेटकर, अरुण वाकुडकर, श्रीधर हंसकर आदी उपस्थित होते.दरवर्षी बिबी येथील युवक फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करून ग्रामस्वच्छतेने दिवाळी साजरी करत आहे. यंदा रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वृक्षारोपण व समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमातून गावात वातावरण निर्मिती करून आदर्श गावाच्या संकल्पनेसाठी चंदू पाटील मारकवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील आजी-माजी सरपंच-उपसरपंचाचा सत्कार करण्यात आला. दादाजी पिंपळकर, चंद्रकांत झुरमुरे, संतोष पावडे, आशाताई मडावी, साईनाथ कुळमेथे, मारोती नैताम, विठ्ठल गेडाम, बबनराव मडावी, राजकुमार हेपट, इंदिरा कोडापे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सकाळी युवकांनी श्रमदान करून गावात स्वच्छता मोहीम राबवली. यात गावातील तरुण सहभागी झाले. क्रिडांगण परिसरात कडुलिंबाची ७० वृक्ष लागवड करण्यात आली. रांगोळी स्पर्धेत प्रथम जया दीपक कापटे, द्वितीय स्वाती कोडापे, तृतीय अश्निी आमने तर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम साक्षी पाचभाई, द्वितीय प्राची खारकर, तृतिय अनामिका शिल यांनी क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून त्यांना पुरस्कृत करण्यात आले. सायंकाळी स्व. उद्धवराव बोबडे बहुउद्देशीय संस्था टेंभूरवाही निर्मिती ‘लोकजागर’ हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. संचालन अविनाश पोईनकर, प्रास्ताविक प्रा. आशिष देरकर तर आभार सचिन खनके यांनी मानले. यशस्वीतेसाठी इराणा तुम्हाणे, गजानन सोनटक्के, उदय काकडे, आसिफ शेख, आशिष पोईनकर, उमेश सपाट यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)