शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत द्यावी

By admin | Updated: June 22, 2017 00:43 IST

राज्यात साप हा वन्य प्राणी असल्यामुळे त्याला पकडण्यास आणि मारण्यास बंदी आहे.

वामनराव चटप : पालकमंत्र्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात साप हा वन्य प्राणी असल्यामुळे त्याला पकडण्यास आणि मारण्यास बंदी आहे. परंतु, विषारी सापांच्या दंशाने तातडीने वैद्यकीय मदत न मिळाल्यास मृत्यू अटळ आहे. म्हणुन सर्पदंशाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या अथवा नागरिकांच्या वारसांना इतर वन्य प्राण्यांप्रमाणे देय असलेली आर्थीक मदत देण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेवून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. वानमनराव चटप यांनी राज्य सरकारकडे केली आहे.सन २०१३ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख दशरथ कान्होबा बोबडे साप चावून मरणाऱ्या शेतकऱ्यास इतर वन्य प्राण्यांप्रमाणे आर्थिक अनुदान, मदत मिळावी, यासाठी वणी येथे उपोषण केले होते. त्यानंतर माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी ग्रामीण भागात अत्यंत जिव्हाळ्याची असलेली ही समस्या राज्याचे तत्कालीन वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचकडे उपस्थित केली होती. तेव्हा अशी मदत दिली जाईल, असे डॉ. कदम यांनी घोषित केले होते. वनखात्याच्या उच्चस्तरीय समितीनेही आर्थिक मदत देण्याचे मान्य केले होते. हा प्रस्ताव वनखात्याकडून अर्थ व नियोजन खात्याकडे आल्यानंतर इतर राज्यात काय व्यवस्था आहे, हे बघून शासनाने मदत देण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशा शेऱ्यासह वनखात्याकडे प्रस्ताव परत आला होता. यानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार येवून ३१ महीने झाले आहे. परंतु, या राज्यातील सत्ता परिवर्तनानंतरही अशी मदत देणारा शासन निर्णय अद्यापही झालेला नाही. याकडेही अ‍ॅड. चटप यांनी लक्ष केले आहे.राज्य सरकारने इतर वन्य प्राण्याप्रमाणे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना न्यायोचित असलेली अथवा वन्य प्राण्यांप्रमाणेच देय असलेली आर्र्थिक मदत द्यावी. यासाठी सरकारने तातडीने धोरणात्मक निर्णय घेवून परिपत्रक काढावे, आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फ डणविस व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनातून केली आहे.