अखेर नवरगाव आरोग्य केंद्राला मिळाली रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST2020-12-11T04:56:11+5:302020-12-11T04:56:11+5:30

परिसरात एखादा गंभीर रुग्ण असल्यास त्याला जिल्ह्याची ठिकाणी हलवायचे असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णास खासगी वाहन करुन उपचारासाठी ...

Finally Navargaon Health Center got an ambulance | अखेर नवरगाव आरोग्य केंद्राला मिळाली रुग्णवाहिका

अखेर नवरगाव आरोग्य केंद्राला मिळाली रुग्णवाहिका

परिसरात एखादा गंभीर रुग्ण असल्यास त्याला जिल्ह्याची ठिकाणी हलवायचे असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णास खासगी वाहन करुन उपचारासाठी न्यावे लागत होते. त्यामुळे येथे रुग्णवाहिकेची मागणी होती. पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून येथे सर्व सोईयुक्त रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली. रुग्णवाहिकेचे लोकार्पण तहसीलदार पर्वणी पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे, ग्रामविकास अधिकारी महेंद्र भडके, वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रृती बोदेले, काँग्रेसचे शहर संघटक विनोद लोणकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनील बोरकर, सामाजिक कार्यकर्ते सुशांत बोडणे, पंकज उईके, संजय सोनकुसरे, शांत बहीरवार, विजय कामडी, निवृत्ती क्षिरसागर, विणायक सोनकुसरे, नितीन मुत्तेमवार, प्रशांत लोखंडे आदी उपस्थित होते.

Web Title: Finally Navargaon Health Center got an ambulance