त्या अकराही महिलांविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST2020-12-13T04:41:54+5:302020-12-13T04:41:54+5:30

फोटो मूल : तालुक्यातील करवन (कोटा) या गावानजिक लागून असलेल्या जंगलामध्ये सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गावातील ११ महिला गेल्या ...

Filed a crime against those eleven women | त्या अकराही महिलांविरुध्द गुन्हा दाखल

त्या अकराही महिलांविरुध्द गुन्हा दाखल

फोटो

मूल : तालुक्यातील करवन (कोटा) या गावानजिक लागून असलेल्या जंगलामध्ये सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गावातील ११ महिला गेल्या असता झुडुपात दबा धरून बसलेला वाघ अचानकपणे समोर आला. त्यामुळे भयभीत महिला वनविभाच्या मचानीवर चढल्या. शुक्रवारीच या महिलांना वनविभागाच्या कर्मचाºयांनी सुखरुप बाहेर काढले. मात्र सरपण आणण्यासाठी राखीव जंगलात गेल्यामुळे अकराही महिलांविरुध्द वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

मूल वनपरिक्षेत्रातील करवन बिटातील जंगलात ११ महिला सरपणासाठी लाकडे आणण्यासाठी गेल्या होत्या. जंगलात दबा धरून बसलेला वाघ अचानक समोर आल्याने महिलांनी जवळच असलेल्या मचानीचा आधार घेत वर चढल्या. तब्बल दोन तासापर्यत वाघ मचानीखाली घिरट्या घालत होता, असे सांगण्यात आले होते. मात्र वनविभागाच्या अधिकाºयांनी सर्व महिलांना विचारपूस केली असता वाघ त्यांना दिसलाच नाही, मचानीखाली घिरट्याही घालत नव्हता, केवळ वाघाची डरकाळी ऐकू आल्याने या महिला घाबरून मचानीवर चढल्याचे महिलांनी सांगितले. वाघ डरकाळी फोडणे ही बाब नैसर्गिक असून वाघाच्या डरकाळीमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व जंगलातही जाऊ नये, असे मूलचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.आर. नायगमकर यांनी सांगितले.

Web Title: Filed a crime against those eleven women