शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

वन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शेतीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:00 IST

यासाठी शेती परिसरात सफाई करण्यात आली असून कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी वनविभाग सातत्याने शिवाराकडे लक्ष ठेवून आहे. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल परिक्षेत्र नॉन बफर म्हणून ओळखला जातो. या परिक्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणात जंगल नसल्याने गावात ंिहंस्र प्राण्यांची भीती नव्हती. मात्र गेल्या काही महिन्यात वाघाची दहशत वाढली असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देवाघाची दहशत कायम : शिवारातील झुडुपे जेसीबीने नष्ट

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : दिवसेंदिवस वाघाच्या हल्ल्याबाबतच्या घटनेत वाढ होत आहे. जंगल नसलेल्या ठिकाणी जिथे आजपर्यंत शेतीची कामे अतिशय आनंदी वातावरणात केले जायची, तिथे आज भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे. मूल बिटात दोन इसमांना काही दिवसापूर्वी वाघाने ठार केल्याने वाघाची दहशत कायम असून शेतातील धानाची बांधणी व चुरणे चक्क वनविभागाच्या देखरेखीखाली होत आहे.यासाठी शेती परिसरात सफाई करण्यात आली असून कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी वनविभाग सातत्याने शिवाराकडे लक्ष ठेवून आहे. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल परिक्षेत्र नॉन बफर म्हणून ओळखला जातो. या परिक्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणात जंगल नसल्याने गावात ंिहंस्र प्राण्यांची भीती नव्हती. मात्र गेल्या काही महिन्यात वाघाची दहशत वाढली असल्याचे दिसून येते. गेल्या सहा महिन्यात ४८ जनावरे व दोन इसमांना ठार केल्याची घटना घडली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संतोष विठ्ठल गुरुनुले (६०) रा.कवळपेठ व शंकर किसन दुधबळे (६०) रा. चिचाळा अशी मृत पावलेल्या इसमांची नावे आहेत. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल परिक्षेत्र हे नॉन बफर म्हणून ओळखले जाते. कक्ष क्रमांक ७५१ मध्ये हा प्रकार घडल्याने या परिक्षेत्रात वाघाची आजही दहशत आहे. या परिक्षेत्रात जंगल नसल्याने वाघाचे अस्तित्व आहे किंवा नाही, या बाबतची सांशकता निर्माण झाली होती. मात्र मागील सहा महिन्यात घडलेल्या घटनांमुळे येथे वाघाचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. गावकरी दहशतीत असून खरीप हंगामातील पिके हातात येण्याची ही वेळ आहे. त्यामुळे वनविभाग सतर्क होऊन प्रत्येक शेतकºयाच्या कामावर लक्ष ठेवून आहे.शेताजवळील परिसराची जेसीबीने सफाईयासाठी वनविभागाचे विभागीय वनअधिकारी सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने शेताजवळील परिसर जेसीबी सहाय्याने मोकळे केले आहे. सोलर बल्बची व्यवस्था करण्यात आली असून शेती परिसरात फिनीशिंग जाळीचे संरक्षण कुंपण करण्यात आले आहे. त्याला हलकासा सोलरच्या साहाय्याने विघुत पुरवठा करण्यात आला आहे. सदर विघुत प्रवाहाने फक्त झटका लागतो. त्यामुळे प्राण्यांचे काहीही नुसकान होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.व्याघ्र संरक्षण दलाचा पहाराशेतात कापणी, बांधणी व चुरण्याचे काम सुरू असल्याने कुठलाही धोका निर्माण होऊ नये यासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दल, वनविभागाचे कर्मचारी व गावातील नागरिकांच्या सहकार्याने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात कुठलीही घटना न घडता नियंत्रणाखाली असल्याचे दिसून येते. मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे काळाची गरज वाटू लागली आहे.चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल बिटात कक्ष क्रमांक ७५१ मध्ये वाघाचे वास्तव्य असून शेतीची कामे करीत असताना विशेष लक्ष घालण्यात येत आहे. सोलर बल्ब, टॅप कॅमेरे, सोलर कंरट आदीची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दल, वनविभागाचे कर्मचारी व नागरिकांच्या सहकार्याने परिसर नियंत्रणात आणले आहे.- पी. जी. खनके,क्षेत्र सहायक मूल.

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरी