शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

९३ गावांंतील पाणी पिण्यास अयोग्य जलजन्य आजार होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील ९३ गावांतील जलस्रोत दूषित असल्याची बाब पुढे आली आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळले नाही. पावसाळा सुरू असल्याने जलजन्य आजारांचा धोका आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या. मात्र, नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाणी उकळून अथवा गाळूनच प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ठळक मुद्देतपासणी अहवाल : कोरोनामुळे जलस्त्रोत तपासणी नमुन्यांची संख्या घटली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत, यासाठी दरवर्षी मे - जून महिन्यात आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तपासले जातात. कोरोना संसर्गामुळे नमुने घेण्याची संख्या घटली. मात्र, या तपासणीतजिल्ह्यातील ९३ गावांतील जलस्रोत दूषित असल्याची बाब पुढे आली आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळले नाही. पावसाळा सुरू असल्याने जलजन्य आजारांचा धोका आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या. मात्र, नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाणी उकळून अथवा गाळूनच प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.आरोग्य विभागामार्फत दरवर्षी ग्रामीण व शहरी भागातील पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. ज्या गावातील पाणी नमुने दूषित आढळतात. त्या ग्रामपंचायतींना पत्र देऊन साथरोग टाळण्यासाठी उपाययोजना सुचविल्या जातात. दूषित पाण्याच्या प्रमाणात वाढ होणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जाते. गतवर्षापासून कोरोनामुळे नमुने घेण्यास कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. कोरोना प्रतिबंधात्मक कामे करीत असतानाच यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी  आरोग्य विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील ३९ आरोग्य केंद्रांमार्फत १ हजार ८३१, तर शहरी विभागातील ६७८ अशा २ हजार ५०९ पाणी नमुन्यांची तपासणी केली. यामध्ये ग्रामीण विभागात १०३ गावातील २३६ व शहरी विभागातील ६३ असे २९९ पाणी नमुने दूषित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. याची टक्केवारी ११.९२ एवढी आहे. पावसामुळे दूषित पाणी वाहून आल्याने जलजन्य साथरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी पाणी शुद्ध करूनच प्यावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नऊ तालुक्यात सर्वाधिक गावे बाधितकोरोनामुळे यंदा प्रशासनाने नवीन विंधन विहिरी आणि हातपंप खोदले नाहीत. कोरोनापूर्वी दरवर्षी उन्हाळ्यात ही कामे केली जातात. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून पाणीटंचाई आराखडा तयार करताना या कामांचा प्राधान्याने समावेश केला जाताे. परंतु, कोरोना निर्बंधांमुळे यंदा आराखड्यानुसार कामे करता आली नाहीत. संभाव्य पाणी टंचाई असणाऱ्या गावांत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून ही कामे करण्यात आली, असा दावा संबंधीत अधिकारी करीत आहेत. खरे तर याच काळात जलस्रोतांचीही तपासणी होते. नमुने कमी असले तरी तपासण्या पूर्ण झाल्या. पाणी पिण्यास अयोग्य असणाऱ्या गावांमध्ये जिवती, कोरपना, नागभीड, गोंडपिपरी, पोंभुर्णा, भद्रावती, मूल व सिंदेवाही तालुक्यातील गावे सर्वाधिक आहेत.

दुर्गम गावांतील जलस्रोत तपासणीविना- कोरोनामुळे पाण्याचे नमुने घेण्यास अडचणी आल्या. राज्य शासनाकडून पाणी तपासणी नमुन्यांचे उद्दिष्ट दिले जाते. जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा, तालुका व ग्रामपंचायत अशा त्रिस्तरीय रचनेतून ही कामे केली जातात.- ज्या गावात पाणी शुद्धीकरणासाठी कोणते यंत्रच उपलब्ध नाही, अशा गावातील नागरिकांना उपलब्ध पाणी स्रोतावरच आपली तहान भागवावी लागते. जिवती तालुक्यातील अनेक गावांपर्यंत जिल्हा परिषदेची पाणी पुरवठा योजनाच पोहोचली नाही. त्यामुळे मिळेल त्या स्रोतांचा वापर केला जातो. आता कोरोना संसर्गाची लाट ओसरल्याने दुर्गम भागातील जलस्रोतांची जिल्हा प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी सरपंचांनी ‘लोकमत’कडे केली आहे. 

 

टॅग्स :Waterपाणी