शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

भय इथले संपत नाही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

मागील काही दिवसांपासून वाघ सातत्याने हल्ले करीत असल्याने त्यांच्या आक्रमकतेपुढे शेतकरी हतबल ठरले आहेत. वाघांनी केलेल्या हल्ल्यांत आजपर्यंत एकट्या कोलारा परिसरात आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाला आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून केला होता.

ठळक मुद्देतीनपैकी एक वाघ जेरबंद : कोलारा परिसरातील अनेक गावे वाघाच्या दहशतीत

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : वाघांची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आजघडीला दोनशेच्या जवळपास वाघाची संख्या आहे. वाढत्या संख्येमुळे वाघ गावशेजारी आले आहेत. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून कोलारा, मासळ परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. शेतीच्या कामासाठी गेलेल्या दोन तर मोहफुल, तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या तीन अशा पाच जणांना वाघाने ठार केले आहे. त्यामुळे शेतात कामासाठी जात असताना मृत्यू समोर वाट बघत असल्याचे चित्र कोलारा परिसरातील गावात दिसत आहे. पाच जणांचा बळी घेणाऱ्या (केटी,१) वाघाला वन विभागाने बुधवारी जेरबंद केले. मात्र जेरबंद केलेल्या वाघाची आई व एक बछडा आजही त्या परिसरात आहेत. ताडोबा लागूनच असल्याने दुसरेही वाघ आहेतच. त्यामुळे किती वाघांना वनविभाग जेरबंद करणार आणि नागरिकांतील भय कधी संपणार, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.मागील काही दिवसांपासून वाघ सातत्याने हल्ले करीत असल्याने त्यांच्या आक्रमकतेपुढे शेतकरी हतबल ठरले आहेत. वाघांनी केलेल्या हल्ल्यांत आजपर्यंत एकट्या कोलारा परिसरात आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाला आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून केला होता. याची दखल घेत वनविभागाने त्या चवताळलेल्या केटी १ वाघाला जेरबंद करून मासळ, कोलारा, बामनगाव, सातारा गावातील नागरिकांना दिलासा दिला आहे. असे असले तरी जेरबंद केलेल्या वाघाची आई शर्मिली व त्याचा एक भाऊ अजून त्या परिसरात आहे. ते चवताळून या परिसरात हल्ला करेल, अशीही भीती आहे.ताडोबा प्रकल्पाबाहेरही वाघांचा वावरताडोबा अंधारी प्रकल्प हे खास वाघासाठी आरक्षित अभयारण्य असले, तरीही जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, भद्रावती, वरोरा, चिमूर तालुक्यातील जंगल परिसरात वाघाची उत्पत्ती झाली आहे. विशेषता चिमूर, ब्रह्मपुरी तालुका आणि त्यातही भद्रावती मोहर्ली, जुनोना परिसर हे शेतकऱ्यांवर हल्ले करण्यासाठी वाघांनी दत्तक घेतले की काय, अशी शंका यावी, असा येथील वाघाच्या हल्ल्याचा इतिहास आहे.शर्मिलीचे कुटुंब तुटलेकोलारा गेट परिसर तथा मदनापूर बफर झोन परिसरात वास्तव असलेल्या शर्मिली वाघिणीच्या कुटुंबाने अनेक पर्यटकांना दर्शन देऊन त्यांचे समाधान केले. मात्र तिच्या एक बछड्याने पाच बळी घेतले. त्यामुळे त्याला वनविभाने जेरबंद केल्याने तिचा परिवार तुटून विस्कळीत झाला आहे.परिसरात मानव-वन्यजीव संघर्षताडोबाच्या जंगल क्षेत्राचा विचार करता वाघाची संख्या वाढल्याने हे क्षेत्र कमी पडू लागले आहे. त्यामुळे या गावातील नागरिक व वाघ यांचा संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात या व्यतिरिक्त दुसरे वाघ येऊन शेतकºयांवर हल्ला करू शकतात. तेव्हा आणखी किती वाघांना जेरबंद करणार आणि नागरिकांचे भय कधी संपणार, असा प्रश्न आहे.

 

टॅग्स :forestजंगल