शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना वाढीव दराने मोबदला

By admin | Updated: March 31, 2016 01:26 IST

दुर्गापूर डीप ओपनकास्ट एक्सटेन्शन प्रकल्पाकरिता जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरु आहे.

हंसराज अहीर : वेकोलि अधिकाऱ्यांना केल्या सूचनाचंद्रपूर : दुर्गापूर डीप ओपनकास्ट एक्सटेन्शन प्रकल्पाकरिता जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरु आहे. यात सिनाळा, जुना मसाळा व नवेगाव या गावातील सुमारे ४१० हेक्टर जमिनीचे अधिग्रहण होत असल्याने या सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच वाढीव मोबदला व नोकऱ्या मिळण्याच्या दृष्टीने स्थानिक विश्रामगृहात ना. हंसराज अहीर यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना पाचारण करुन त्यांना अनेक सूचना केल्या.सदर बैठकीस वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक मिश्रा, नियोजन, कार्मिक तसेच सीएसआर विभागाच्या अधिकाऱ्यांसह भाजपा जिल्हासचिव राहुल सराफ, पंचायत समितीचे माजी सदस्य लोकचंद कापगते, सरपंच गीता वैद्य, उपसरपंच बंडू रायपुरे, पोलीस पाटील जीवनकला मांडवकर, तुकाराम तेलंग, किशोर मांडवकर, श्रीधर रोहनकर, नत्थू पेंदाम, संतोष वांढरे, निमसटकर व बहुसंख्य प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.केंद्रीय राज्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सक्सेशन सर्टीफिकेटला प्राधान्य देऊन याबाबतचा मार्ग मोकळा करावा, अशा सूचना क्षेत्रीय महाप्रबंधकास दिल्या. शासनाद्वारे सातबारावर नोंदी असलेल्या वारसांना ग्राह्य धरुनच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच सिनाळा या गावाच्या अडचणी विचारात घेऊन पुनर्वसन कार्याला गती द्यावी. तसेच या प्रकल्पाच्या कॉम्प्लेक्सशन बिलात दुरुस्ती करुन प्रबंधननाने मुख्यालयास प्रस्ताव सादर करावे.नोकरीचा विषय तातडीने मार्गी लागेल, या दृष्टीकोनातूनही कार्यवाही करावी, असे निर्देश वेकोलि अधिकाऱ्यांना दिले. क्षेत्रीय महाप्रबंधक मिश्रा यांनी मंत्रिमहोदयांनी केलेल्या सूचनांचे पालन करुन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, अशी हमी हंसराज अहीर यांनी उपस्थित पदाधिकारी व प्रकल्पग्रस्तांना दिली. (शहर प्रतिनिधी)