शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणार

By admin | Updated: December 24, 2014 22:57 IST

कृषीप्रधान देशात प्रत्येक राज्यातील शेतकरी जोपर्यंत सुखी होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या कल्याणकारी योजना राबवून शेवटच्या टोकावरील

हंसराज अहीर : प्रभाकर मामुलकर यांचा सत्कारराजुरा : कृषीप्रधान देशात प्रत्येक राज्यातील शेतकरी जोपर्यंत सुखी होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या कल्याणकारी योजना राबवून शेवटच्या टोकावरील शेतकऱ्याला समाधान प्राप्त करुन देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असे प्रतिपादन रसायन व खते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. राजुरा येथे आयोजित शेतकरी मेळावा, कृषी व तंत्र व्यवसाय प्रदर्शन व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. हंसराज अहीर होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, ज्युनिअर अमिताभ बच्चन, भाजपाचे विधानसभा प्रमुख खुशाब बोंडे, राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण मस्की, राजुरा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष बंडू माणूसमारे, गोंडी सिने अभिनेता रमेश आत्राम, प्राचार्य दौलतराव भोंगळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे उपाध्यक्ष श्रीधर गोडे, कार्याध्यक्ष मुर्लीधर धोटे, जाहेद हुसेन बियाबानी, दत्तात्रय येगीनवार, दिलीप नलगे, सतिश धोटे, माजी आमदार एकनाथ साळवे, रमजान अली, जिल्हा परिषद सभापती प्रा. संभा वरकड, देवराव भोंगळे, शांताराम चौखे, अनिल फुलझेले उपस्थित होते. यावेळी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, सुमन मामुलकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. आर. डी. बारई लिखित पुस्तकाचे प्रकाशन, संमोहन तज्ज्ञ जि.प. सदस्य देवराव भोंगळे, जितेंद्र विरुटकर यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी सरला गादंगीवार, चंद्रशेखर मादनेलवार, सनोवर बेग, शामलाल राठोड, गिता चिंतुरवार, सोनी गड्डमवार, विजय कुळमेथे, राहुल भिडकर, अरुण कुमरे, आडकु कुमरे, जयतू कोडापे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तथा संस्थेच्या वतीने स्कूल बसचे विमोचन तथा माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांचेकडून स्वामी विवेकांनद अनाथ आश्रमाला २१ हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला. ह्युमन राईट कान्सील आॅफ इंडियाच्या वतीने ना. हंसराज अहीर यांचा लाडुतूला करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केले. संचालन प्रा. बी. यू. बोर्डेवार यांनी केले. तर आभार बादल बेले यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)