शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

युरिया खताच्या टंचाईने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:01 IST

तालुक्याला वार्षिक १ हजार ६०० टन युरियाची आवश्यकता भासते. मागील वर्षीच्या हंगामात १ हजार ४३ टन युरियाचा वापर झाला होता. मात्र यावर्षी तालुक्यातील ठोक विक्रेत्यांना २८८ टन युरिया उपलब्ध झाला. आहे. त्यामुळे तालुक्यात युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. सद्यस्थिती रोवणी सुरू असल्याने युरिया खतासाठी शेतकरी शोधाशोध करीत आहेत.

ठळक मुद्देतालुक्यात फक्त २२.०७ मेट्रीक टन साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सद्यस्थितीत सहा थोक विक्रेत्यांपैकी ४ विके्रत्यांकडे बुधवारी केवळ २२.०७ टन युरिया उपलब्ध असल्याची माहिती आहे.तालुक्याला वार्षिक १ हजार ६०० टन युरियाची आवश्यकता भासते. मागील वर्षीच्या हंगामात १ हजार ४३ टन युरियाचा वापर झाला होता. मात्र यावर्षी तालुक्यातील ठोक विक्रेत्यांना २८८ टन युरिया उपलब्ध झाला. आहे. त्यामुळे तालुक्यात युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. सद्यस्थिती रोवणी सुरू असल्याने युरिया खतासाठी शेतकरी शोधाशोध करीत आहेत.तालुक्यात धानाचे पीक घेतले जाते. एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाते. २५ हजार हेक्टरमध्ये रोवणी तर ५ हजार हेक्टरमध्ये आवत्या टाकल्या जाते. धान पिकाला युरिया खताची आवश्यकता असते. मात्र नेमक्या याचवेळी बाजारात युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. युरिया खत खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रात जात आहेत. मात्र कृषी केंद्र संचालकांकडे उपलब्ध नसल्याने परत यावे लागत आहे. तालुक्यात सहा थोक विक्रेते आहेत. यामध्ये सेवा सहकारी सोसायटी तळोधी, पोशट्टीवार फर्टीलाझर्स तळोधी, आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी गिरगाव, शरद कृषी केंद्र नागभीड, खरेदी व्रिकी संस्था नागभीड व विविध कार्यकारी सोसायटीचा समावेश आहे. या विक्रेत्यांकडून लहान विक्रेत्यांना वितरण केले जाते. मात्र थोक विक्रेत्यांकडेच युरिया उपलब्ध नाही. बुधवारपर्यंत सहा विक्रेत्यापैकी विविध कार्यकारी सोसायटीकडे १० मेट्रीक टन, पोशट्टीवार फर्टिलायझर ९.४५ टन, शरद कृषी केंद्र २.२५ टन युरियाचा साठा शिल्लक होता. अन्य तीन विक्रेत्यांकडे युरिया खत शिल्लक नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :agricultureशेती