शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विभागाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना त्रास

By admin | Updated: October 26, 2014 22:38 IST

सिंचन विभाग चारगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ओलिताच्या अंतीम टप्प्यातील चंदनखेडा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे व दोषपूर्ण वितरण पद्धतीमुळे नाहक

आयुधनिर्माणी (भद्रावती : सिंचन विभाग चारगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ओलिताच्या अंतीम टप्प्यातील चंदनखेडा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे व दोषपूर्ण वितरण पद्धतीमुळे नाहक त्रास सोसावा लागत आहे. संबंधितांनी ओलिताकरिता सुरळीत पाणी पुरवठा न केल्यास धान उत्पादन संकटात सापडण्याची शक्यता शेतकरी बोलून दाखवित आहे.चारगाव प्रकल्पांतर्गत सिंचन होत असलेला आलिताचा अंतीम टप्पा म्हणजे चंदनखेडा परिसरातील शेती. या परिसराततील धान उत्पादक चारगाव धरणातून मिळणाऱ्या पाण्याद्वारे आपापल्या शेतीत ओलीत करुन शेतीत धानाचे उत्पादन घेतात. परंतु या प्रकल्पांतर्गत येणारा हा शेवटचा टप्पा असल्याने या भागात नेहमीच पाण्याच्या वितरणाबाबत तक्रारी असतात. सिंचन विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे व दोषपूर्ण वितरणपद्धतीमुळे धानाला वाजवी पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतीत पाणी मिळविण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये आपापसात भांडणतंटे होत असल्याचे बोलले जाते.असेही सांगण्यात येत आहे की केवळ अर्ध्या एकर शेतीत पाणी घेण्याकरिता शेतकऱ्यांना शेतातील कामे सोडून आठवडाभर नाहक त्रास भोेगावा लागतो. त्यामुळे या परिसरातील धानउत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. शेतकऱ्यांकडून अतिरिक्त आर्थिक लाभ मिळविण्याकरिता संबंधित विभागातील कर्मचारी अपुरा पाणी पुरवठा करीत असल्याचा आरोपही दबक्या आवाजात होत आहे. आर्थिक व्यवहारामुळेच अनेकांना हेतुपूरस्पर पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे. चंदनखेडा- मुधोली परिसरातील युवा कार्यकर्ते सुधीर मुडेवार, किशोर ठावरी आमदार बाळू धानोरकर यांना निवेदन देण्यात आले आहे. यात सिंचन विभागाने या कुचकामी व अकार्यक्षम पाणी पुरवठा यंत्रणेत बदल घडवून सर्व शेतकऱ्यांना आवश्यक पाणी पुरवठा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली आहे. नवनियुक्त आमदार य संबंधात काय भूमिका घेतात, याकडे धान उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)