शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी सहकारी विपणन संस्थांची स्थापना करावी - सुभाष धोटे

By admin | Updated: July 29, 2014 23:44 IST

सहकार क्षेत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले असून शेतातील मालाच्या खरेदी- विक्रीची व्यवस्था करण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी सहकारी विपणन संस्थाची स्थापना करावी, असे आवाहन विदर्भ को- आॅपरेटीव्ह

चंद्रपूर : सहकार क्षेत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले असून शेतातील मालाच्या खरेदी- विक्रीची व्यवस्था करण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी सहकारी विपणन संस्थाची स्थापना करावी, असे आवाहन विदर्भ को- आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. नागपूरचे संचालक तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी केले. गडचांदूर येथील सुखकर्ता मंगल कार्यालयात दि विदर्भ को- आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. नागपूर शाखा चंद्रपूरच्या वतीने आयोजित विक्रेता संमेलन व शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरुन आमदार सुभाष धोटे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, संचालक दिलीप नलगे, जि.प. सदस्य नानाजी आदे, श्रीधरराव गोडे, माजी जि.प. सदस्य सिताराम कोडापे, विठ्ठलराव थिपे, रमाकांत कोमावार, मस्जीद कुरेशी, भाऊराव चव्हाण, दिवाकर बोर्डे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार सुभाष धोटे यांनी शासनाचे रासायनिक खत, बफर झोनमध्ये संस्थेचा सहभाग, शेतकऱ्याच्या बांधावर रासायनिक खते या शासनाच्या योजनेबाबत संस्थेची वाटचाल, जिल्ह्यातील सहकारी संस्था व बचत गटांचे सक्षमीकरण तसेच शेतकऱ्यांना पुरक धंदा, जोडधंदा, पशुपालन, शेतकऱ्यांच्या बांधावर फळ लागवड, अन्य जोडधंदा करण्याविषयी व शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेतर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता माती परिक्षण प्रयोगशाळा उभारण्याचा मानस व्यक्त केला. त्यामुळे रासायनिक खतांचा समतोल होईल व शेतजमिनीची सुपीकता कायम राहील.कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे यांनी जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांकरिता विविध योजना, महिला बचत गटाच्या सक्षमीकरण करण्याच्या नविनतम योजना याबाबत माहिती दिली. संस्थेचे कार्यकारी संचालक हरिबाबू यांनी चालू खरिप हंगामाकरिता खत पुरवठा- मागणी तसेच संस्थेची वाटचाल व प्रगतीविषयी माहिती दिली. संमेलनात रासायनिक खत उत्पादक संस्था, जिल्हा बँक , बी-बियाणे उत्पादक कंपनी, इत्यादींनी आपल्या उत्पादनाची प्रदर्शनी लावून शेतकऱ्यांना योजनाची माहिती दिली. संमेलनाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांनी केले. याप्रसंगी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सहकारी संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, महिला बचत गटातील पदाधिकारी, पुरुष बचत गट पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)