शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:32 IST

वर्धा ते हिंगणघाट मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने याकरिता सोनेगाव ते एकुर्ली या पांदण रस्त्यावरुन दिवस-रात्र मुरुमाची वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देवाहतुकीमुळे पीके धोक्यात : नायब तहसीलदारांकडून मौका चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (टा.) : वर्धा ते हिंगणघाट मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने याकरिता सोनेगाव ते एकुर्ली या पांदण रस्त्यावरुन दिवस-रात्र मुरुमाची वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या पिकांच्या नुकसान भरपाईकरिता तळेगाव ते धोत्रा रस्त्यावर गावकऱ्यांसह शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी वाहतूक करणारे टिप्पर दिवसभर रोखून धरण्यात आले. अखेर नायब तहसिलदार जाधव यांनी मौका चौकशी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
सोनेगाव ते ऐकुर्ली हा शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ता आहे. याच रस्त्यावर कंत्राटदार कंपनीने मुरुम व दगडाकरिता शेत विकत घेतले आहे. या शेतातून पादणरस्त्याने मुरुमाची रात्र-दिवस वाहतूक सुरु आहे. या वाहतूकीमुळे उडणारी धुळ शेतातील गहू, चना, कापूस व तुरीवर गोळा होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. म्हणून या पिकांची नुकसान भरपाई मिळण्याकरिता जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलिंद भेंडे, अखिल मानवाधिकार आॅर्गनाईझेशनचे जिल्हा अध्यक्ष रवि तडस, सरपंच अतुल तिमांडे, माजी जि.प.सदस्य प्रमोद वरके यांच्यासह नागरिक व शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. तलाठी व नायब तहसीलदारांनी मौका चौकशीकरुन पंचनामा केल्यानंतर सायंकाळी सहा वाजता रस्ता मोकळा करण्यात आला.

नायब तहसीलदारांनी मौका चौकशी पंचनामा केला. उत्खनाचे आदेश पाहिले. टी.पी. तपासल्या, मौका चौकशीत शेतकऱ्याची नोंद केली. हा पंचनामा शुक्रवारी तहसिलदारांकडे सादर करण्यात येणार आहे.
- मधुकर गेडाम, तलाठी, तळेगाव (टा.)

पांदण रस्त्याने होणाऱ्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा गावकऱ्यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- अतुल तिमांडे, सरपंच, तळेगाव (टा.)

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप