शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:26 AM2021-01-22T04:26:21+5:302021-01-22T04:26:21+5:30

बल्‍लारपूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी ...

Farmers hit tehsil office | शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक

शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक

Next

बल्‍लारपूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेंतर्गत नियमित कर्ज भरणारे व थकबाकी नसलेल्‍या शेतकऱ्यांना प्रोत्‍साहन म्‍हणून ५० हजारांची रक्‍कम देण्‍याचे शासनाने जाहीर केले होते. ती अजूनही मिळाली नाही. शबरी आवास योजना, रमाई आवास योजनेचे पैसे थकीत आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्‍या नुकसानाची भरपाईचा पत्ता नाही. संजय गांधी निराधार योजनेच्‍या लाभार्थ्‍यांचे थकीत द्यावे, भारनियमन रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांंनी तहसीदारांकडे निवेदनातून केली आहे. या मोर्चाचे नेतृत्‍व सोमेश्‍वर पद्मगिरीवार यांनी केले. यावेळी सुनील फरकडे, विनायक कोसरे, श्‍यामराव जुनघरे, रूपेश पोडे, श्‍यामसुंदर झाडे, राजू रेनकुंटलवार, योगेश पोतराजे, गणपत मोरे, किसन उरकुडे, कल्‍पना देशमुख, स्‍नेहल टिंबडिया, सरला परेकर, सविता नेवारे, दिवाकर कंबलवार व बहुसंख्य शेतकरी माेर्चात सहभागी झाले होते.

Web Title: Farmers hit tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.