शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पैसेवारीने केला शेतकऱ्यांचा घात

By admin | Updated: October 17, 2015 01:33 IST

राज्य सरकारने अलीकडेच घोषित केलेल्या आणेवारीने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा घात केला आहे.

सरकारच्या मते जिल्ह्यात सुकाळ : सर्व गावांची पैसेवारी ५० टक्क्यांवरचंद्रपूर : राज्य सरकारने अलीकडेच घोषित केलेल्या आणेवारीने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा घात केला आहे. जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० टक्क्यांवर असल्याने एकाही गावाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गात कमलीची नाराजी व्यक्त होत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात धान आणि कापसाचे मुख्य पीक आहे. यंदा अगदी अत्यल्प पाऊस पडल्याने धानाचे पीक वाया गेले आहे. अनेक ठिकाणी धान पाण्याअभावी सुकल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापसाच्या बाबतीही असेच आहे. पिकावर लाल्या रोग आल्याने कपाशी वाया गेली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर असताना जिल्ह्यात दमदार पाऊस झाला होता. त्याचा आधार मिळाल्याने पिके काही प्रमाणात तरली असली तरी अनेक गावांमध्ये पिकांची स्थिती बिकट आहे.जिल्ह्यात मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, चिमूर, चंद्रपूर हे तालुके धान पिकात अव्वल आहेत. अन्य ठिकाणी कापूस, सोयाबिनचे उत्पन्न शेतकरी घेतात. मात्र या वर्षी सर्वच ठिकाणी पिके अडचणीत आहेत. प्रकल्पात पाणीसाठा अपुरा असल्याने शेतीसाठी पाणी सोडताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. परिणामत: भविष्यात शेतकरी विरूद्ध प्रशासन अशी संघर्षाची स्ष्ट चिन्हे दिसत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)