शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, आशा सोडू नका !

By admin | Updated: December 13, 2014 22:34 IST

राजस्व अभियानासारख्या योजना जनतेच्या मनातील वैफल्यातील भावना दूर करण्यास मदत करतात. जनता ज्या अडचणींचा सामना करीत आहे, त्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाने

समाधान मेळावा : नक्षलग्रस्त गावात पोहोचले राज्यपाल
राजुरा : राजस्व अभियानासारख्या योजना जनतेच्या मनातील वैफल्यातील भावना दूर करण्यास मदत करतात. जनता ज्या अडचणींचा सामना करीत आहे, त्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाने नुकत्याच काही मदतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर कठीण परिस्थिती ओढविली आहे. अशाही कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांनी आशा सोडू नये, शासन सदैव आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाही देत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी हताश झालेल्या शेतकऱ्यांना नवी उर्मी दिली.
राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथे आयोजित सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत समाधान योजना व जनजागरण मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरूनुले, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, राज्यपालांचे सचिव विकास रस्तोगी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील आदी उपस्थित होते.
राज्यपाल पुढे म्हणाले, आता जनतेला जलद सेवा देण्याचे दिवस आले आहेत. सेवा प्राप्त करून घेणे हा जनतेचा हक्क असून सुवर्ण जयंती राजस्व अभियानासारखे कार्यक्रम सर्व विभागाच्या सेवा जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्यास मदत करतात. अशा सेवा जनतेला तत्परतेने उपलब्ध करून देण्यात येतात, तेव्हाच जनतेमध्ये समाधान तसेच शासनाप्रति विश्वास निर्माण होतो, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले.
यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तेलगू-मराठी भाषकांचे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी आपण संपूर्ण सहकार्य करणार आहोत. या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबध्द असून जनतेच्या कल्याणासाठीच तिजोरीतून खर्च केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात राजस्व विभागाकडून विविध क्षेत्रातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतराचे पट्टे, वनाचे मालकी हक्काचे प्रमाणपत्र, घटस्फोटीत महिलांना धनादेश राज्यपालाच्या हस्ते देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)