शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:53 IST

शेतकऱ्यांना सन २०१८ चा पिक विमा अद्यापही मिळालेला नाही. आधार लिंकचे कारण सांगून शेतकºयांची पिळवणूक केली जात आहे. राज्यातील शेतकरी मरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे. कृषी विभाग, विमा कंपन्या व जिल्हा प्रशासनाला सक्तीचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची व्यवस्था सरकारने करावी, चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा आदी मागण्याही करण्यात आल्या.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : संभाजी ब्रिगेडची कर्जमुक्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तसेच विमा कंपन्यांकडून शेतीच्या नुकसानीचा व्यवस्थित सर्व्हेकरण्यात आलेला नाही. दुष्काळाने होरपळलेला शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झालेला असून अद्यापही त्याला मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्या कर्जाच्या ओझ्याखाली असून त्यांना कर्जमुक्ती करून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संभाजी बिग्रेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, धान, बाजरी, ज्वारी, उडीद व भाजीपाला आदी पिकांची पेरणी केली होती. संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने नुकसान झाले. जिल्ह्यात अंदाजे ३५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य यांच्यासह शिष्टमंडळाने केली आहे.शेतकऱ्यांना सन २०१८ चा पिक विमा अद्यापही मिळालेला नाही. आधार लिंकचे कारण सांगून शेतकºयांची पिळवणूक केली जात आहे. राज्यातील शेतकरी मरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे. कृषी विभाग, विमा कंपन्या व जिल्हा प्रशासनाला सक्तीचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची व्यवस्था सरकारने करावी, चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा आदी मागण्याही करण्यात आल्या. शिष्टमंडळात विभागीय अध्यक्ष विनोद थेरे, जिल्हा सचिव गजानन नागपुरे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सचिन बोधाने, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष भोयर, महानगराध्यक्ष विवेक बोरीकर आदींची उपस्थिती होती.२०२१ मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसींची प्रवर्गनिहाय जनगणना करावी, महापोर्टलच्या माध्यमातून भरतीमध्ये बेरोजगारांवर अन्याय झालेला आहे. सदर परीक्षा पोर्टल बंद करावे, राज्यातील सर्व शासकीय विभागांतर्गत सर्व प्रलंबित सरकारी रिक्त २ लाख पदे तात्काळ भरती करावी, उद्योगांमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा आदी मागण्याही करण्यात आल्या.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती