शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

लघुसिंचन कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे

By admin | Updated: June 23, 2017 00:33 IST

तालुक्यातील डोंगर्ला येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी तलावाच्या बांधकामाकरिता सन २००३ मध्ये संपादित करण्यात आल्या.

१४ वर्षांपासून मोबदला नाही : अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील डोंगर्ला येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी तलावाच्या बांधकामाकरिता सन २००३ मध्ये संपादित करण्यात आल्या. मात्र तब्बल १४ वर्षांनंतरही या शेतकऱ्यांना तलावात गेलेल्या जमिनीचा मोबदला लघसिचंन विभागाने दिला नाही. त्यामुळे डोंगर्ला येथील संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी दीड वाजता लघु सिंचन कार्यालयाला कुलूप ठोकले.चिमूरपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगर्ला येथे जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत लघु सिंचन विभागाकडून २००३ ला ३२ शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादीत केल्या व सन २००५ मध्ये तलावाचे बांधकामही पूर्ण झाले. मात्र मागील १४ वर्षापासून या शेतकऱ्यांना एक दमडीही मोबदला दिला नाही. तलावात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी कितीवेळा तरी धरणे आंदोलन, पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे गुरुवारला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात कुलूप ठोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान तालुकास्तरीय लघु सिंचन विभाग तसेच जिल्हा परिषद अंतर्गत कार्यकारी अभियंता यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कार्यवाहीची मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकरी संघटनेचे नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात लघु सिंचन विभाग पंचायत समिती या कार्यालयाला सांकेतीक ताला ठोको आंदोलन करुन चाबी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. आंदोलनात पीडित शेतकरी संजय जांभुळे, हरिचंद्र जांभुळे, यशवंत चौधरी, सुधाकर जांभुळे, विकास जांभुळे, विनोद जांभुळे, राजूब कुंभले, दिलीप गजभे, संतोष गजभे, बळीराम जांभुळे महादेव नन्नावरे, हरिदास जांभुळे, मोतीराम जांभुळे आदी शेतकरी सहभागी होते.