शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

एका तपापासून शेतकरी मोबदल्यापासून वंचित

By admin | Updated: April 25, 2015 01:28 IST

चिमूर तहसील अंतर्गत येणाऱ्या डोगर्ला येथे सन २००२ मध्ये सिंचाई विभागाद्वारे मामा तलावाचा विस्तार करण्यात आला.

खडसंगी : चिमूर तहसील अंतर्गत येणाऱ्या डोगर्ला येथे सन २००२ मध्ये सिंचाई विभागाद्वारे मामा तलावाचा विस्तार करण्यात आला. त्याकरिता जाभुळविहिरा साजातील डोंगर्ला गावातील ११ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली आल्या. या शेतकऱ्याच्या जमिनी शासनाने हस्तांतरित करून घेतल्या. मात्र तलावात जमिनी गेलेले ११ शेतकरी एका तपापासून मोबदल्यापासून वंचित आहेत.शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, म्हणून शासन गावाशेजारी असलेल्या पुरातन तलावाचे विस्तारीकरण करून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ देते. याकरिता मौजा डोगर्ला येथील मामा तलावाचे विस्तारीकरण करण्यात आले. या तलावाच्या विस्तारीकरणाचे डोंगर्ला येथील ११ शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली आल्या. त्यामुळे या शेतकऱ्यांना या जमिनीवर पीक घेता येत नसल्याने शासनाने त्यांना शासकीय दरानुसार मोबदला देण्याचा नियम आहे. प्रभावित शेतकऱ्याने रितसर सिंचन विभागाकडे मागणी केली. मात्र मागील १३ वर्षांपासून या शेतकऱ्यांचे प्रस्ताव कार्यालयातच धूळखात पडले आहेत.बाधित शेतकरी अनेक वर्षांपासून चिमूर येथील सिंचाई विभागाचे उंबरठे झिजवीत आहे. मात्र येथील अधिकारी शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊन पीडित शेतकऱ्यांना आल्या पावली परत पाठवितात. त्यामुळे शेतकऱ्यांनी विदर्भवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संयोजक नारायण जांभुळे याच्याकडे आपबिती सांगितली असता, जांभुळे यांनी शुक्रवारी दुपारी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेवून लघु सिंचाई कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या अन्यायग्रस्त शेतकऱ्याच्या ठिय्या आंदोलनाचा धसका घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी एक महिन्यात या शेतीचा प्रस्ताव पाठविल्याचे आश्वासन अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना दिले.