शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन न केल्यास फाशी आंदोलन

By admin | Updated: December 22, 2016 01:58 IST

एप्रिल २०१६ मध्ये युती शासनाने राज्यातील तब्बल ७२ अनुदानित आदिवासी आश्रमशाळांची मान्यता रद्द केली.

संघटनेचा इशारा : आश्रमशाळेतील कर्मचारी पेंढरी (कोके) : एप्रिल २०१६ मध्ये युती शासनाने राज्यातील तब्बल ७२ अनुदानित आदिवासी आश्रमशाळांची मान्यता रद्द केली. त्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी हे अतिक्ति झाले. परंतु बऱ्याच कर्मचाऱ्यांचे शासनाने अजूनही इतरत्र समायोजन केले नाही. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे समायोजन न केल्यास फाशी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यात अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर या विभागातील आश्रमशाळांचाही समावेश आहे. शाळा बंद पडल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना ‘काम नाही वेतन नाही’ या ८ जूनच्या शासन निर्णयानुसार माहे मे २०१६ म्हणजेच तब्बल आठ महिण्यापासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. समायोजनाचे पत्र २४ आॅगस्टला आले होते. त्यानुसार कर्मचारी शाळेवर रूजू होण्यास गेले असता संबंधित संस्थाधिकाऱ्यांनी जागा रिक्ता नसल्याचे कारण सांगून रूजू करून घेतले नाही तर काही कर्मचाऱ्यांना रूजू करून घेतले आहे. या बाबतीत शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र झाडे, राज्य संघटक प्रा. संजय खेडीकर, विभागीय कार्यवाह प्रा. दिलीप तडस यांनी नागपूर अधिवेशन काळात आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची भेट घेवून समस्या सांगितली असता सर्वांचे आदिवासी विभागाचाही ‘नो वर्क नो पेमेंट’चा जी.आर. रद्द करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. कोणताही कर्मचारी वेतनाविना व रिकामा राहणार नाही, असेही शिष्टमंडळास सांगितले. परंतु शासन अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत जागा कमी असल्याचे कारण सांगून गेल्या आठ महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे समायोजन करीत नाही. कर्मचाऱ्यांचे हाल करीत आहे. त्यांचा अंत पाहत आहे. परंतु आदिवासी विभागाने कर्मचाऱ्याचा अंत न पाहता राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील खाजगी अनुदानित संस्थेतील कर्मचाऱ्यांना शालेय शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय व सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये समकक्ष पदावर ‘लीन’ची (धारणाधिकार) सवलत देवून प्रतिनियुक्तीने नियुक्त केल्यास शासनाला ही अडचण येणार नाही व कर्मचारीही रिकामे राहणार नाही. येत्या आठ दिवसात अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन न केल्यास आदिवासी आश्रम शाळा कर्मचारी संघटना फाशी आंदोलन करेल असा इशारा संघटनेने दिला आहे. (वार्ताहर)