अखेर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:25 IST2021-01-22T04:25:59+5:302021-01-22T04:25:59+5:30

चंद्रपूर : कोविड १९च्या कालावधीत मनपाअंतर्गत सेवा दिलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहनपर ९१ दिवसांच्या प्रलंबित वेतनाचा तिढा उच्च न्यायालयाच्या ...

Eventually, the salaries of health workers skyrocketed | अखेर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला

अखेर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला

चंद्रपूर : कोविड १९च्या कालावधीत मनपाअंतर्गत सेवा दिलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहनपर ९१ दिवसांच्या प्रलंबित वेतनाचा तिढा उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुटल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कुटुंब कल्याण माता-बाल संगोपन व शालेय आरोग्य योजनेतील नऊ कर्मचाऱ्यांनी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे चौथा, पाचवा व सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन लागू करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना कोविड १९ काळातील कर्मचारी हे मनपाचे असल्याने त्यांना मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आयोगाचे लाभ देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यामुळे माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याचा विषय १९ जानेवारी २०२१ रोजी सर्वसाधारण सभेत ठेवला. जीआयए योजनेतील इतर कर्मचारी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या वेतन आयोगानुसार वेतन मागणीकरिता मनपा प्रशासनाविरोधात न्यायालयात गेले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही चौथा, पाचवा व सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनाचा लाभ देण्यात येणार आहे.

Web Title: Eventually, the salaries of health workers skyrocketed