शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बोझा असतानाही तलाठ्याने केला सातबारा कोरा

By admin | Updated: March 16, 2015 00:48 IST

चिमूर तालुक्यातील मदननापूर (तु.) यथील भूमापन क्रमांक ९६ आराजी १.०४ हेक्टर आर या शेतजमीनीच्या सातबाऱ्यावर बोझा असतानाही...

खडसंगी: चिमूर तालुक्यातील मदननापूर (तु.) यथील भूमापन क्रमांक ९६ आराजी १.०४ हेक्टर आर या शेतजमीनीच्या सातबाऱ्यावर बोझा असतानाही मदनापूर साजाचे तलाठी भरत पगाडे यांनी सातबारा कोरा दाखवून शेतकरी योगेश थुटे यांच्यासह मासळ येथील सहकारी बँक शाखेचीही फसवणूक केली. आता अन्यायग्रस्त शेतकरी न्यायासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहे.मदनापूर (तुकूम) येथील भूमापन क्रमांक ९६ आरजी १.०४ हेक्टर आर शेत जमीन काशिनाथ सीताराम हातभिडे यांच्या मालकीची होती. या शेतजमिनीवर मासळ येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतून एक लाख रुपये कर्जाची उचल केली. कर्जाच्या बोझा असतानाही मतदनापूर तलाठी भरत पगाडे यांनी अर्थपूर्ण व्यवहार करुन बोझा नसल्याचा सातबारा त्यांना दिला. याच सातबारावरुन शेतकरी सीताराम हातभिडे यांच्याकडून ११ सप्टेंबर २०१२ ला ही शेत जमीन योगेश थुटे यांनी विकत घेतली. मात्र मंडळ अधिकारी नेऊलकर यांनी या जमीनीचा फेरफार करुन सातबारा घेतला असता, या सातबाऱ्यावर मासळ बँकेचे कर्ज असल्याचा बोझा चढवून सातबारा देण्यात आला. या सर्व प्रकरणामध्ये तलाठी भरत पगाडे यांनी मासळ सहकारी बँक शाखा व शेती विकत घेणारे योगेश थुटे यांची फसवणूक केली. त्यामुळे तलाठी पगाडे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून बडतर्फ करण्याची मागणी योगेश थुटे यांनी पत्रकार परिषदेतून केली. शेतकरी योगेश थुटे यांनी मंडळ अधिकारी यांच्याकडून शेतीवरील बोझाचा सातबारा मिळताच, आपली फसवणूक झाल्याची तक्रार चिमूर तहसीलदारांकडे ३ नोव्हेंबर २०१४ ला केली होती. त्याअनुषंगाने तहसील कार्यालयाकडून थातूर-मातूर चौकशीचा फार्स करण्यात आला. मात्र अजुनही तलाठ्यावर कारवाई करण्यात आली नाही.याच अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडेसुद्धा तक्रार दाखल केली. दरम्यान, त्यांनी तहसीलदारांना ५ नोव्हेंबर २०१४ ला कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र चार महिन्यांचा कालावधी होवूनसुद्धा वरिष्ठाकडून कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे महसूल अधिकारी फसवणूक करणाऱ्या तलाठ्याला अभय देत असल्याचा आरोप ेथुटे यांनी यावेळी केला. या प्रकरणाची चौकशी करून न्याय द्यावा, अशी थुटे यांची मागणी आहे. (वार्ताहर) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बगलजिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर चिमूर दौऱ्यावर आले असता अन्यायग्रस्त शेतकरी योगेश थुटे यांनी या प्रकरणाविषयी भेट घेवून त्यांच्यापुढे आपली विवंचना मांडली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना तलाठी भरत पगाडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन दोन दिवसात अहवाल देण्याच्या सूचना केल्या. मात्र अद्यापही तलाठ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.