शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

४२७ गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

गावामध्ये शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. मात्र गावांमध्ये विविध मंडळाद्धारे गणेश मुर्तीची स्थापना करण्यात येत होती. त्यामुळे आपले मंडळ गावातील इतर मंडळापेक्षा वरचढ ठरावे या समजूतीने गावातील गणेश मंडळांमध्ये चढाओढ असायची.

ठळक मुद्दे११०० सार्वजनिक गणेश मंडळ : १२ हजार ४०० घरगुती गणपतीं विराजमान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गाव पातळीवर दाखल होणारे तंटे सोडविण्याच्या दृष्टीने तंटामुक्त समित्या स्थापना करण्यात आल्या. याच समितीने पुढाकार घेत एक गाव एक गणपतीची सुरुवात केली. गणपती उत्सवात गावात शांतता राहावी यासाठी तंटामुक्त समितीच्या वतीने जिल्ह्यातील ४२७ गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली. जिल्ह्याभरात एक हजार १५७ सार्वजनिक गणेशाची तर १२ हजार ४०० च्या जवळपास घरगीती गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.गावामध्ये शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. मात्र गावांमध्ये विविध मंडळाद्धारे गणेश मुर्तीची स्थापना करण्यात येत होती. त्यामुळे आपले मंडळ गावातील इतर मंडळापेक्षा वरचढ ठरावे या समजूतीने गावातील गणेश मंडळांमध्ये चढाओढ असायची. अनेकवेळा गावांमध्ये वादसुद्धा होत होते. दरम्यान, सन २००७ ला गाव विकासाच्या प्रक्रियेत अडसर ठरलेले तंटे सोडवून विकासाचा मार्ग सुकर करण्यासाठी सरकारने तंटामुक्त समितीची स्थापना केली. त्यानंतर एक गाव एक गणपतीची संकल्पना सुरु केली. त्यानुसार यावर्षी ४२७ गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.चंद्रपूरमनपातर्फे २२ कृत्रिम तलावश्रीगणेश मूर्तीच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी २२ कृत्रिम तलाव आणि १५ निर्माल्य कलश निर्माण करण्यात आले आहेत. दाताळा रोड (पुलाजवळ), संजय गांधी मार्के, पं. दीनदयाल उपाध्याय तुकूम प्राथमिक शाळा, एस.टी. वर्कशॉप चौक, विठ्ठल मंदिरामागे, नेताजी चौक, बंगाली कॅम्प झोन आॅफीस जवळ इत्यादी ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. या ठिकाणी वैद्यकीय पथ, अग्निशनम दल, वीज व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.चंद्रपूर शहरात २४३ गणेश मंडळचंद्रपूर शहरात २४३ च्या जवळपास गणेश मंडळाची स्थापना झाली आहे. घुग्घूस शहरात २५, ग्रामीण २४, पडोली शहरी सहा आणि ग्रामीण मध्ये २० सार्वजनिक गणेश मंडळांनी स्थापना करण्यात आली आहे.पुरस्कारातून जनजागृतीगणपती उत्सवादरम्यान गावात शांतता राहावी, यासाठी एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या संकल्पनेमध्ये गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा, यासाठी मागील सरकारने पुरस्कारसुद्धा सुरु केले होते. त्यानंतर एक गाव एक गणपती या संकल्पनेत अनेक गावांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव