शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण ग्रामसमृद्धी योजनेचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: October 26, 2014 22:36 IST

शासनाने सन २०१० पासून पर्यावरण ग्रामसमृद्धी योजना राज्यात सुरु केली. यासाठी ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र सदर निधीचा उपयोग न करता बऱ्याच ग्रामपंचायतींनी

कोट्यवधी रुपये पाण्यात : कुठे गेले निर्मल ग्राम ?लखमापूर : शासनाने सन २०१० पासून पर्यावरण ग्रामसमृद्धी योजना राज्यात सुरु केली. यासाठी ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र सदर निधीचा उपयोग न करता बऱ्याच ग्रामपंचायतींनी या योजनेअंतर्गत असलेली कामेच केली नाही. त्यामुळे शासनाचे निर्मल ग्राम पुरस्काराचे स्वप्न हे स्वप्नच राहिले असून कोरपना, जिवती तालुक्यासह जिल्ह्यातच या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला दिसून येत आहे.या योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना एक ते सहा लाखापर्यंत निधी देण्यात आला. ज्यामध्ये गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करणे, शौचालय बांधणे, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षलागवड व संगोपन, ग्रामस्वच्छता, नरेगाव अंतर्गत झाडांसाठी खड्डे खोदणे आदी कामे करावयाची होती. परंतु अनेक ग्रामपंचायतींनी थातूरमातूर कामे करुन निधीची उचल केली आहे. कोरपना तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींना सदर निधीचा पुरवठा केल्याचे समजते. यामधून २८ ग्रामपंचाययतीची निवड निर्मल ग्राम पुरस्कारासाठी करण्यात आली होती. मात्र गावात ही योजना प्रभावीपणे न राबविल्याने एकही ग्रामपंचायत पुरस्कारासाठी पात्र ठरली नाही. परिणामी शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचे चित्र दिसते. प्रत्येक गावात वैयक्तिक शौचालय असावे व गाव हागणदारी मुक्त व्हावे, यासाठी वैयक्तिक शौचालय निधी म्हणून १२०० ते १०,००० रुपयापर्यंत निधी देण्यात आला. यात अनेक गावांमध्ये शौचालय बांधण्यात आले नसल्याचे समजते. काही ग्रामपंचायतींनी पहिल्या टप्प्यातील निधी खर्च करुनही दुसऱ्या टप्प्यातील निधींसाठी ग्रामपंचायती पात्र ठरलेल्या नाही. वृक्षलागवडीसाठी साधारणत: दोन बाय दोन आकाराचे खड्डे खोदण्याचे आदेश संबंधित विभागामार्फत देण्यात आलेले होते. मात्र खड्डेच खोदले नसल्याचे चित्र सर्वत्र दिसते.सन २०१०-११, ११-१२, १२-१३, १३ ते २०१४ मध्ये चार वर्षापासून योजनेअंतर्गत निधी ग्रामपंचायतींना उपलब्ध होेत असताना सदर कामे गेली कुठे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. झाडांची लागवड करताना झाडांचे संगोपन, पाणी व्यवस्थापन न करता कागदोपत्री मात्र वृक्षारोपण झाल्याचे समजते. एकंदरीत शासनाने निर्मल ग्रामचे उद्दिष्ट सफल करण्यासाठी खर्च केला. मात्र या निधीचा उपयोग झालेला दिसत नाही. १० वर्षात कोरपना तालुक्यात एकही गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झालेले दिसत नाही. हागणदारीमुक्त गाव योजनेसाठी शासन अनेक उपक्रम व बक्षिस योजना राबवित असताना निधी तर खर्च होतो. परंतु गाव हागदारीमुक्त होत नसल्याचे दिसते. (वार्ताहर)