शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उपेक्षित जीवनाचा अंतही बेवारस...!

By admin | Updated: February 5, 2015 23:06 IST

आयुष्याच्या अखेरच्या क्षणी ज्या खांद्यावरून अनंतयात्रेसाठी निघायचे, त्याच खांद्याला चिकटलेले हात बेईमान झालेत. क्षुल्लक कारणावरून घराबाहेर हुसकावून लावल्यानंतर येथील

भिक्षुखांचे भयान वास्तव : मृत्यूनंतर पोलीस दफ्तरी ‘अज्ञात’ म्हणून नोदरुपेश कोकावार - बाबूपेठ (चंद्रपूर)आयुष्याच्या अखेरच्या क्षणी ज्या खांद्यावरून अनंतयात्रेसाठी निघायचे, त्याच खांद्याला चिकटलेले हात बेईमान झालेत. क्षुल्लक कारणावरून घराबाहेर हुसकावून लावल्यानंतर येथील महाकाली मंदिर परिसरात उपेक्षेचं जीणं जगणाऱ्या वृद्धांच्या नशिबी मरणदेखील बेवारस यावे, ही बाब नियतीलाही एकवार अंतर्मुख करायला लावणारी आहे. गेल्या पाच वर्षांत या परिसरात भिक्षा मागून जगताना मृत्यू आलेल्या जवळपास ४० जणांची नोंद पोलीस दफ्तरी ‘बेवारस’ म्हणून करण्यात आली आहे.गृहकलहातून घराबाहेर काढून देण्यात आलेल्या अनेकजणांसाठी माता महाकाली मंदिर आधार ठरले. भिक्षा मागत जगतानाच अनेकांना या ठिकाणी मृत्यू आला. त्यांपैकी काहींची ओळख पटली, तर काहीजण आजही ‘अज्ञात’ आहेत. मंदिराच्या कुठल्या कोपऱ्यात निर्जीव देह आढळला की कुणीतरी पोलिसांना याबाबत माहिती द्यावी. मग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रेताचा पंचनामा करावा. नातलगांचा काही सुगावा लागतो का ते बघावे. त्यात यश आले नाही तर ढक्कल ठेला आणावा. त्यात तो निर्जीव देह टाकून त्याची स्मशानात विल्हेवाट लावावी, असेच सोपस्कर आजवर पार पडत गेले आहे. ज्या काळजाच्या तुकड्याला जीवापाड जपत अंगा-खांद्यावर खेळवून मोठे केले. भविष्यात तोच काळजाचा तुकडा आपल्याशी बेईमान होईल, असे यांपैकी कुणालाही वाटले नसले. पण दुर्दैवाने ते भोग त्यांच्या नशिबी आले. नातवंडांना मांडीवर खेळवत वृद्धापकाळ घालविण्याचे स्वप्न डोळ्यात रंगविणाऱ्या या भिक्षूकांची स्वप्न मात्र नियतीनं करपून टाकली. घरातून हाकलून दिल्यानंतर भिक्षापात्र हाती घेऊन लाचारीचं जीणं जगणाऱ्यांसाठी ‘माणुसकी’धाऊन येईल काय?