शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीतील रस्त्यांवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

गेल्या काही वर्षात शहराचा पसारा मोठया प्रमाणात वाढला आहे. वाढत्या शहरानुसार वाहनांच्या संख्येतही भर पडत आहे. मात्र शहरातील रस्ते अनेक वर्षांपासून अरुंदच आहेत. अशातच या रस्त्यावर व्यवसायिकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनगरपालिका करते तरी काय ? : वाहतुकीची कोंडी, अपघात वाढले

रवी रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : संपूर्ण शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून शहरातील काही मुख्य चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरातील सर्वच वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने ही समस्या गंभीर झाली आहे. रस्ते अरुंद झाले असून वाहतूक कोंडीमुळे अपघातही वाढले आहे.गेल्या काही वर्षात शहराचा पसारा मोठया प्रमाणात वाढला आहे. वाढत्या शहरानुसार वाहनांच्या संख्येतही भर पडत आहे. मात्र शहरातील रस्ते अनेक वर्षांपासून अरुंदच आहेत. अशातच या रस्त्यावर व्यवसायिकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. याचा नाहक मनस्ताप वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. शहरातील शिवाजी चौक, सावरकर चौक, रेणुकामाता चौक, झांशी राणी चौक, सावरकर चौक, फाशी चौक, बाजार चौक, ख्रिस्तानंद चौक, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक, गुजरी वार्ड हे मुख्य चौक असून या ठिकाणीदेखील अतिक्रमणाची समस्या गंभीर झाली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सातत्याने होत आहे. असे असतानाही नगरपालिका प्रशासनाला याचे काही देणेघेणे दिसत नाही. सदर मुख्य चौकांमधून दररोज शेकडो वाहने धावतात. परंतु रस्ते अरुंद असल्यामुळे वाहनधारकांचे नियंत्रण सुटून अनेकदा अपघात घडले आहेत. वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन नगरपालिका तथा पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन सदर वाहतूक कोंडी दूर करावी, अशी मागणी नागरिकांची आहे.पालिकेची मोहीम थंडबस्त्यातकाही वर्षांपूर्वी किंवा अधून-मधून नगरपालिका प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीम राबवत असते. परंतु काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे होते. आता मागील काही वर्षांपासून पालिकेने अशी मोहीम हाती घेतली नाही. अतिक्रमणाबाबत आता ठोस पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे.