शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि प्रकल्पग्रस्तांना शैक्षणिक पात्रतेनुसार मिळणार रोजगार

By admin | Updated: March 21, 2017 00:39 IST

वेकोलिमध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी सतत प्रयत्न व संघर्ष केल्यानंतर हा गुंतागुंतीचा व बऱ्याच अवधीपासून लोंबकळणारा ...

हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना यश : प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंद चंद्रपूर : वेकोलिमध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी सतत प्रयत्न व संघर्ष केल्यानंतर हा गुंतागुंतीचा व बऱ्याच अवधीपासून लोंबकळणारा प्रश्नही ना. अहीर यांच्या माध्यमातून मार्गी लागल्याने नव्याने प्रकल्पग्रस्त म्हणून वेकोलिमध्ये रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शिक्षणाचा सन्मान ठेवत त्यांच्या पात्रतेनुसारच नोकरी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.त्यामुळे वेकोलि प्रकल्पग्रस्तांनी ना. अहीर यांचे अभिनंदन करून आभार मानले आहे.यापूर्वी वेकोलि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीला वाढीव मोबदला, प्रकल्पग्रस्तांना विसंगती असलेल्या नियमात बदल करून न्यायोचित मार्गाने नोकऱ्या मिळवून देण्यात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांना यश आले होते. त्यानंतर आता कोल इंडिया लिमीची सब्सीडी वेकोलि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार आजतागायत काम देण्यात येत नव्हते. बहुतांशी नव्याने नियुक्त होणाऱ्या वेकोलि प्रकल्पग्रस्तास जनरल मजदूर कॅटेगरी-१ या पदावरच समावून घेतले जात होते. सदर प्रकार अन्यायी असल्याने ना. हंसराज अहीर यांनी ही बाब कोळसा मंत्रालय कोल इंडिया तसेच वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे शैक्षणिक अर्हतेनुसारच संबंधित प्रकल्पग्रस्तांना वेकोलि प्रबंधनात तत्सम पदावर सामावून घेण्यात यावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अनेक बैठकांच्या माध्यमातून त्यांनी हा प्रश्न उपस्थित करून संबंधिताने लक्ष वेधले होते. अखेर त्यांच्या या भूमिकेवर शिक्कामोर्तब करून वेकोलिच्या फंक्शनल डायरेक्टरांच्या ६९४ व्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यास कोल इंडिया व वेकोलिला बाध्य केले. त्यामुळे या निर्णयामुळे वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या शिक्षणाचा सन्मान होवून त्यांच्या पात्रतेनुसारच आता नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.तांत्रिक शिक्षण, आयटीआय, डिप्लोमाधारक, अभियांत्रिकी यासारख्या पदवीधारकांना तसेच बी.ए. व तत्सम पदवीधारकांना त्याचबरोबर दहावी इयत्ता पास व यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असलेल्या व ३५ वर्ष पेक्षा कमी वयोमर्यादा असणाऱ्यांची सुरक्षाकर्मी म्हणून प्रकल्पग्रस्तांची वेकोलिमध्ये नियुक्ती होणार असून ही निवड ऐच्छिक स्वरूपाची ठेवण्यात आली आहे. हा निर्णय हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून घेतल्या गेल्याने वणीचे आ. संजय रेड्डी बोदकुरवार, राजुऱ्याचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, पूर्व पालकमंत्री संजय देवतळे, विजय राऊत, व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आभार मानले. (नगर प्रतिनिधी)