शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या धोरणाविरुद्ध कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:01 IST

केंद्र व राज्य शासनाच्या या धोरणाविरुद्ध तसेच अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना या तिन्ही संघटनाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच जिल्ह्यातील अन्य शासकीय कार्यालयाजवळ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दीपक देऊरकर, सरचिटणीस रमेश पिंपळशेंडे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आले.

ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी निवेदन : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवाची पर्वा न करता योद्धा म्हणून लढा देणाऱ्या सरकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांची कुचंबना आणि आर्थिक गळचेरी केली जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या या धोरणाविरुद्ध तसेच अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना या तिन्ही संघटनाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच जिल्ह्यातील अन्य शासकीय कार्यालयाजवळ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दीपक देऊरकर, सरचिटणीस रमेश पिंपळशेंडे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आले.अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आवाहनानुसार कर्मचारी संघटनांनी निदर्शने केली. यामध्ये पीएफआरडीए कायदा रद्द करा, सर्वांसाठी जुनी पेंन्शन योजना लागू करा, शासकीय, निमशासकीय महामंडळे, नगरपालिका, महापालिका, शैक्षणिक संस्था आणि विविध प्रकल्पातील रिक्त असलेली पदे तत्काळ भरा, कंत्राटी तथा मानधनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करा, महागाई भत्ता, प्रवास भत्ता, प्रोत्साहन भत्ता गोठविण्याचे धोरण रद्द करून जुलै २०१९ पासून अद्यावर महागाई भत्ता फरकासह द्यावा या मागण्यांसह महारीच्या विरोधात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा निश्चित करावी, सर्वच कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू करावी, कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा उपकरण पीपीई, रबरी हातमोजे, मास्क, प्लास्टिक क्हर आदी पुरवाव्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचे कपास केलेले वेतन त्वरित द्या आदी मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, जिल्ह्यातील इतरही शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.विविध कार्यालयात निदर्शनेजिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, भु-विज्ञान व खनिकर्म कार्यालय, कोषागार कार्यालय, प्रशासकीय भवन, वनकार्यालय, बांधकाम विभाग, कृषी विभाग, तहसील कार्यालय सावली तथा अन्य कार्यालयांचा समावेश आहे.शासनाच्या धोरणाविरुद्ध यापूर्वी २२ मे आणि ४ जून रोजी राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावर निदर्शने करण्यात आली. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले. शासकीय कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवावे तसेच इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.- दीपक जेऊरकरअध्यक्ष, सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,चंद्रपूर

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप