शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित वसतिगृहातील कर्मचारी हक्कापासून वंचित

By admin | Updated: December 17, 2015 01:13 IST

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग मार्फत स्वयंसेवी संस्थेअंतर्गत सन १९५१ पासून २ हजार ३८८ अनुदानीत वसतिगृह राज्यात चालविले जातात.

चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग मार्फत स्वयंसेवी संस्थेअंतर्गत सन १९५१ पासून २ हजार ३८८ अनुदानीत वसतिगृह राज्यात चालविले जातात. या वसतिगृहात २४ तास काम करणारे कर्मचारी अगदी तुटपुंज्या मानधन दिले जात असल्याने कर्मचारी हक्कापासून वंचित आहेत. वसतिगृहाचे प्रशासन चालविण्याच्या दृष्टीने हे कर्मचारी महत्वाचे असून आजपर्यंत वेतनश्रेणी मिळाली नाही. त्याचप्रमाणे शासकीय वसतिगृह, अनुदानीत आश्रमशाळा काम करणाऱ्या कर्मचारी वेतनश्रेणी दिली जाते. ही तफावत दूर करण्यासाठी संघटनेने गेल्या २५-३० वर्षापासून शासन दरबारी संघर्ष लढा सुरू होता. परंतु मागच्या आघाडी सरकारने न्याय दिला नाही. आघाडी सरकारच्या अधिवेशन काळात ना. एकनाथ खडसे, ना. विनोद तावडे, ना. संजय सवकारे, रामनाथ दादा मोसे, संजय केळकर, अर्पुवा हिरे यांनी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्यासाठी प्रश्न उपस्थित केला असता, आघाडी सरकारने लवकरात लवकर वेतनश्रेणी लागू करू, असे लेखी स्वरूपात आश्वासन देवून सभागृहाची दिशाभूल केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना वेतनश्रेणीबाबत त्यांनी १९ वेळा तारांकित प्रश्न उपस्थित केला व अर्थ व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ९ वेळ प्रश्न उपस्थित केला व आमदार नागो गाणार यांनी ३ वेळा प्रश्न उपस्थित केले. परंतु आघाडी शासनाने हेतु पुरस्पर दुर्लक्ष करून सदर कर्मचाऱ्यांना हक्कापासून वंचित ठेवले. त्यामुळे भाजप शासनाने तरी ‘समान काम, समान वेतन’ या शासन धोरणाची अंमलबजावणी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रदेश उपाध्यक्ष ए.डी. जाधव, जिल्हाध्यक्ष सी.एच. चव्हाण, सचिव विकास कासारे यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)