रेती घाटावरून तस्करीचे आठ टॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST2020-12-11T04:55:58+5:302020-12-11T04:55:58+5:30

गोंडपिपरी : तालुक्यातील वाळू घाटावर रेती तस्करांचा गोंगाट सुरु आहे. हिवरा घाटावरून तीन हायवे जप्त केल्याची कारवाई ताजी असतानाच ...

Eight tractors smuggled from Sand Ghat seized | रेती घाटावरून तस्करीचे आठ टॅक्टर जप्त

रेती घाटावरून तस्करीचे आठ टॅक्टर जप्त

गोंडपिपरी : तालुक्यातील वाळू घाटावर रेती तस्करांचा गोंगाट सुरु आहे. हिवरा घाटावरून तीन हायवे जप्त केल्याची कारवाई ताजी असतानाच कुलथा घाटावरून आठ ट्रॅक्टर महसूल विभागाने जप्त केले आहे. यातील चार ट्रॅक्टर रेतीने भरलेले होते. तर चार ट्रॅक्टर रिकामे होते. वाळू भरलेल्या ट्रॅक्टरमालकावर प्रति ट्रॅक्टर एक लाख दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आला आहे.

गोंडपिपरी तालुक्यात रेती तस्करांनी चांगलाच धुडगुस घातला आहे. रात्रभर जागून वाळूची चोरी सूरू आहे. तीन दिवसांपूर्वीच हिवरा घाटावरून वाळूची चोरी करणाºया तीन हायवा, एक पोकलेन महसूल विभागाने ताब्यात घेतल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच कुलथा घाटावरून रेती चोरणाºया आठ ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेतले आहेत. कुलथा घाटावरून मोठया प्रमाणात रेतीची चोरी सुरू असल्याचा अनेक तक्रारी गोंडपिपरीचे तहसिलदार के.डी.मेश्राम यांना प्राप्त झाल्या होत्या. बुधवारी रात्री तहसिलदार मेश्राम यांनी सहकाºयांसोबत कुलथा घाट गाठला.घाटावर ट्रॅक्टरची गर्दी दिसून आली.

घाटावरील रेती लगतचा २१५ सर्व्हे नंबर असलेल्या शेतात डंपिंग केली जात होती. महसूल विभागाचे कर्मचारी घाटावर आले. याची माहीती लागताच ट्रक्टर चालक घाटावरून पसार झाले. घाटावरील चार वाळूने भरलेल्या आणि चार रिकामे ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेतले आहे.

बॉक्स

चोरीसाठी विना नंबरच्या गाड्या

रेती चोरीसाठी तस्करांनी विना नंबरच्या गाडयांचा वापर केला आहे. पकडण्यात आलेल्या आठ ट्रॅक्टरपैकी पाच ट्रॅक्टरना नंबरच नाही. त्यामुळे या ट्रॅक्टर कुणाच्या आहेत, याचा शोध विभाग घेत आहेत. पकडण्यात आलेल्या आठ ट्रॅक्टरपैकी चार ते पाच टॅÑक्टर राजकीय व्यक्तीच्या असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Eight tractors smuggled from Sand Ghat seized