शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार गरिबांना मिळणार घरकूल

By admin | Updated: April 1, 2016 01:20 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून इंदिरा आवास योजना राबवली जाते.

इंदिरा आवास योजना : सुधारित प्रतीक्षा यादी प्रकाशितअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून इंदिरा आवास योजना राबवली जाते. या योजनेतून गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी हक्काचा निवारा दिला जात आहे. प्रशासनाने नुकतीच सुधारित प्रतीक्षा यादी प्रकाशित केली असून त्यानुसार जिल्ह्यातील ८ हजार ५४६ गरिबांना घरकूल मिळणार आहे. यात अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्यांक घटकांचा समावेश आहे.जिल्हा प्रशासनाने इंदिरा आवास योजनेतील अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्यांक प्रवर्गातील घरकूल लाभार्थ्यांची यादी संपुष्टात आल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात अनेकांना घरकूल योजनेचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत गावपातळीवर लाभार्थ्यांनी ओरड केली होती. परिणामी शासनाच्या ग्रामविकास विभागाने आदेश निर्गमीत करून पुन्हा सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गावपातळीवर ग्रामसभेच्या माध्यमातून घरकूल लाभार्थ्यांची सुधारित प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली. या यादीला जिल्हा परिषद प्रशासनाने १० मार्चला मान्यता दिली आहे.इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्यांक प्रवर्गातील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र भद्रावती, पोंभूर्णा व वरोरा तालुक्यात अनुसूचित जाती घटकांतील तर बल्लारपूर, ब्रह्मपुरी, मूल, पोंभूर्णा, सिंदेवाही व वरोरा तालुक्यात अल्पसंख्यांक प्रवर्गातील लाभार्थी संख्या शून्य आहे.योजनेतील लाभार्थ्यांना २६९ चौरस फुटाच्या बांधकामासाठी शासनाकडून एक लाख रुपये अनुदान देण्याची तरतुद आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात घरकूल मंजुरी आदेशासोबत ३७ हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात छतापर्यंतच्या बांधकामासाठी ३७ हजार रुपये व घरकुलाचे शौचालयासह बांधकाम पूर्ण झाल्यावर २६ हजार रुपये अंतीम टप्प्यात दिले जाते. घरकुलाची नोंद ग्रामपंचायत स्तरावर कुटुंबातील महिला सदस्यांच्या नावे करणे गरजेचे असून पती, पत्नीचे नाव संयुक्त असावे असे म्हटले आहे. बल्लारपूर तालुक्याला २१८ घरकूलइंदिरा आवास योजनेच्या सुधारित प्रतीक्षा यादीत बल्लारपूर तालुक्यातील २१८ घरकूल लाभार्थ्यांचा समावेश असून अनुसूचित जाती प्रवर्गातील १४ आणि अनुसूचित जमाती घटकांतील २०४, दारिद्रय रेषेखालील व्यक्तीना घरकूल देण्यात आले आहे. विसापूर ग्रामपंचायतीला ११५, काडजई २२, गिलबिली २४, कोर्टीमक्ता १२, किन्ही ८, इटोली ३ व मानोरा १ असे ग्रामपंचायतींना उद्दिष्ट देण्यात आले. विशेष म्हणजे ३१ डिसेंबर २०१५ अन्वये बल्लारपूर तालुक्यासाठी इतर मागास प्रवर्गासाठी केवळ ३०, अनुसूचित जाती ७६, अनुसूचित जमाती ११ व अल्पसंख्यांक घटकांसाठी ४ असे एकूण १२१ घरकुलांना मान्यता देण्यात आली होती.पोंभूर्णा तालुक्याला वगळलेग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या आदेशान्वये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सुधारित घरकुलाची यादी सादर करण्यात आली. याला पुरवणी प्रतीक्षा यादी असे नाव देण्यात आले. त्यानुसार पोंभुर्णा तालुक्यात अनुसूचित जाती शून्य, अनुसूचित जमाती शून्य व अल्पसंख्यांक घरकुल लाभार्थी संख्या देखील शून्य दर्शविण्यात आली आहे. घरकुलाच्या सुधारित प्रतीक्षा यादीतून पोंभूर्णा तालुक्याला वगळण्यात आल्याने घरकुल योजनेच्या लाभार्थ्यात असंतोष पसरला आहे.