शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By admin | Updated: December 13, 2014 01:22 IST

भटाळी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

चंद्रपूर : भटाळी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या शाळेत सद्यस्थितीमध्ये एक ते आठपर्यंत वर्ग आहे. शाळेची पटसंख्या ११८ असून शिक्षक संख्या रेकॉर्डवर सहा आणि प्रत्यक्षात पाच अशी आहे. शासनाच्या नियमानुसार ११८ विद्यार्थ्यांना सहा शिक्षकांची गरज आहे. पण भटाळी शाळेत प्रत्यक्षात पाच शिक्षकच एक ते आठ वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे काम करीत आहेत.
मागील दोन वर्षांपूर्वी येथील एक शिक्षिका निलंबित झाली आहे. त्यामुळे तिचे हजेरीपटावर नाव आहे. शासनाकडून तिला वेतनही मिळत आहे. परंतु ती जागा भरता येत नाही, असे कार्यालयाचे म्हणणे आहे. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यावर होत आहे, ही बाब मात्र जि.प. च्या लक्षात येत नाही. शिक्षकाची कमतरता लक्षात घेऊन मागील सत्रापासून शिक्षकाची मागणी करणारे पत्रसुध्दा दिले. परंतु गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक देतो, असे तोंडी तात्पुरते आश्वासन देऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना चूप केले. त्यानंतर शाळा समितीचे सदस्य सुभाष गौरकार यांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी सुद्धा समायोजनानंतर तुम्हाला एक शिक्षक देण्यात येईल, असे सांगून विषय तेथेच थांबविला. त्याचवेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढेही समस्या मांडण्यात आली. त्यांनी सुद्धा चंद्रपूर जिल्हा परिषदेकडे भटाळी शाळेला एक शिक्षक देण्यात यावा, असे पत्र दिले. त्यानंतर आॅगस्ट महिन्यात समायोजन झाले. निलंबित शिक्षिकेच्या जागेवर एका शिक्षकाचे समायोजन करण्यात आले. शाळेत आदेश प्राप्त झाला. परंतु ते शाळेत रूजू झाले नाही. आणि हा प्रवास इथेच थांबून आहे. एकूणच या साऱ्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक थांबलेले नाही. याकडे प्रशासनाचे लक्ष नसून यामध्ये आर.टी.एफ. च्या बट्याबोळ होत आहे. एकीकडे शासन प्राथमिक शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष पुरवून विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करीत असल्याचा खोटा गवगवा करीत आहे. प्रत्यक्षात मात्र खेडोपाडी शाळेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे विदारक चित्र आहे. वारंवार मागणी करूनही शिक्षक देत नाही, शिक्षक दिला तर त्यांना भारमुक्त करीत नाही. याला कोणते प्रशासन म्हणायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेवटी पर्याय उरला नाही नाही.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शाळा व्यवस्थापन समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या १५ दिवसांत शिक्षक मिळाला नाही तर शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा सुभाष गौरकार माजी पं.स. सदस्य यांनी दिला आहे. आता जि. प. प्रशासन गावकऱ्यांच्या या इशाऱ्याची कशी दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)