शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

चोरांच्या भीतीने ग्रामस्थांचा खडा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 12:42 AM

जंगलव्याप्त गावांमध्ये रात्री ८ ते ९ सुमारास टार्च उजेडाचे संकेत. यामुळे गावात चोर येण्याची भिती. गावकऱ्यांची टार्चच्या उजेडाच्या दिशेने चोरांना पकडण्यासाठी एकच धावपळ. चोर पसार होण्यात यशस्वी होतात, याची गावकऱ्यांत प्रचंड दहशत.

ठळक मुद्देचिचपल्ली परिसर दहशतीत : अनोळखी लोकांवर हल्ल्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जंगलव्याप्त गावांमध्ये रात्री ८ ते ९ सुमारास टार्च उजेडाचे संकेत. यामुळे गावात चोर येण्याची भिती. गावकऱ्यांची टार्चच्या उजेडाच्या दिशेने चोरांना पकडण्यासाठी एकच धावपळ. चोर पसार होण्यात यशस्वी होतात, याची गावकऱ्यांत प्रचंड दहशत. यातून एखाद्या अनोळखी इसमावर प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाली. गावाच्या दिशेने व अंगणात चोर येतात. या भितीमय वातावरणात मागील चार दिवसांपासून चिचपल्ली परिसरातील गावागावात गावकऱ्यांचा रात्रभर खडा पहारा असल्याचे वास्तव ‘लोकमत’ प्रतिनिधीच्या शुक्रवारी दिलेल्या प्रत्यक्ष भेटीतून समोर आले.गावात चोरी करण्यासाठी व लहान मुलांचे अपहरण करून किडनी चोर रॅकेट सक्रीय झाल्याची अफवा गावागावात पसरली आहे. या प्रकाराने गावकरी चांगलेच धास्तावले आहेत. गावात चोर येतात असे खात्रीने गावकरी व्यथा मांडतात. पकडण्यासाठी चोरांच्या मागे गावकरी धावतात, त्यावेळी अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेनी धूम ठोकतात. मात्र मागील चार दिवसांपासून एकही चोर गावकऱ्यांच्या तावडीत सापडला नाही. हे मात्र तेवढेच सत्य आहे. शुक्रवारी चिचपल्ली परिसरातील पेठ, झरी, हळदी, वलनी, चेक निंबाळा, पाहमी आदी गावातील भेटी दरम्यान ‘लोकमत’जवळ गावकऱ्यांनी व्यथा मांडली.प्रचंड दहशतीत असलेल्या गावकऱ्यांनी याची माहिती पोलीस प्रशासनाला दिली. दोन दिवसापूर्वी पोलिसांनी सदर गावात रात्रीच्या सुमारास गस्तही चालविली. मात्र अद्याप एकही चोर गवसला नाही. दरम्यान पाहमी गावात असताना रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे, पोलीस हवालदार शंकर आत्राम, राजेश मडावी, किशोर शहारे, प्रमोद कोटनाके, प्रभू शंकर गावंडे, आज दुपारी ३ वाजता पाहमी गावात चौकशीसाठी आले. त्यांनी गावकऱ्यांशी घटनेसंदर्भात विचारपूस केली. अफवावर विश्वास ठेवू नका म्हणून गावकऱ्यांशी संवादही साधला.गावकऱ्यांनी भिती बाळगू नये - पोलीस प्रशासनचंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली परिसरातील गावकऱ्यांत भितीचे वातावरण अफवेमुळे पसरले आहे. त्यामुळे गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी पोलीस ताफ्यासह संपर्क केला जात आहे. त्यांचेशी संवाद साधला जात आहे. रात्रीच्या सुमारास सशस्त्र दल गस्तीवर ठेवण्यात आले आहे. गावकरी अनोळखी इसमाकडे आधार कार्ड सारखे ओळखपत्र मागत असल्याचे दिसून येते. यामुळे गावकरी दडपणात वावर असून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी व गावकºयातील भितीचे सावट दूर करण्याच्या प्रयत्न केला जात रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक गोतमारे यांनी लोकमतला सांगितले.गावकऱ्यांच्या भीतीदायक प्रतिक्रियाचंद्रपूर-मूल राज्य महामार्गावरुन १२ किलोमीटर अंतरावर उत्तरेस असलेल्या झरी येथील फुलाबाई पेंदोर म्हणाल्या, रात्रीच्या वेळी गावात पहिल्यांदा चोर टॉर्च उजेड टाकतात. त्या दिशेने गावकरी धावले. मात्र जंगलात ५ ते ६ च्या संख्येतील चोर पळून गेले. तीन दिवसांपासून गावातील ३५ घरातील लोकांना चोराच्या भितीने रात्र जागावी लागते.झरीपासून जवळ असलेल्या पेठ येथे २० घरांची वस्ती आहे. झरी प्रवेशद्वारालगत हे गाव आहे. येथील बाल गोविंद शेडमाके म्हणाले, माझ्या अंगणात दोन दिवसांपूर्वी तीन ते चारच्या संख्येत असलेल्यांनी दारावर रात्रीच्या सुमारास लाईट मारला. आरडाओरड करून पाठलाग केला असता, ते जंगलात पळून गेले. तेव्हापासून सर्वच गावकरी रस्त्यालवरच जागून रात्र काढत आहेत.वलनी येथील भाऊजी कोटनाके म्हणाले, आमच्या गावात चोरांची भिती. रात्र रात्र जागावे लागत आहेत. तुम्ही कोण आहात ते सांगा असा संतापही व्यक्त केला.दुर्गम भाग व जंगल व्याप्त पाहमी गावातील श्रीराम आत्राम म्हणाले, आमच्या गावात २८ घरे असून रात्री लहान मुलांना पळवून किडणी काढतात, अशी चर्चा जोमात आहे. रात्री ९ वाजता दरम्यान जंगलातून टॉर्चद्वारे उजेड मारला जातो. त्यावेळी गावकरी एकबटून दिशेनी धावतात. तीन दिवसांपासून रात्रभर पहारा दिला जात आहे.

टॅग्स :Thiefचोर