शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
2
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
3
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
4
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
5
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
6
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
7
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
8
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
9
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
10
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
11
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
12
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
13
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
14
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
15
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
16
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
17
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
18
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
19
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
20
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. शीतलच्या आठवणी जागवत शर्वीलने वाढदिवशी केले वृक्षारोपण; आनंदवन झाले भावुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 02:13 IST

वृक्ष लागवड केल्यानंतर शर्वील आपल्या आईच्या समाधीजवळ गेला. त्यावेळी त्याच्या डोळ्यात आसवे तरंगत होती.

वरोरा(चंद्रपूर) : डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्युला शुक्रवारी  पाच दिवस झाले. डाॅ. शीतलचा सहा वर्षीय मुलगा शर्वीलचा आज वाढदिवसही होता. दरवर्षी आई डाॅ. शीतल वृक्षारोपण करून आपल्या शर्वीलचा वाढदिवस साजरा करायची. आज शर्वीलने आईच्या आठवणीत रोप लावून आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी आनंदवनातील वातावरण भावूक आणि नि:शब्द होते. 

वृक्ष लागवड केल्यानंतर शर्वील आपल्या आईच्या समाधीजवळ गेला. त्यावेळी त्याच्या डोळ्यात आसवे तरंगत होती. हातात जास्वंदाचे फूल घेऊन बोबड्या शब्दांत ‘मम्माऽऽ’ अशी हाक मारत त्याने आपल्या आईच्या समाधीवर ते फूल अर्पण केले. या भावूक क्षणाचे साक्षीदार त्याचे वडील गौतम करजगी, आजोबा डाॅ. विकास आमटे, आजी भारती आमटे, सुहासिनी करजगी व शिरीष करजगी यांच्यासह आनंदवनातील परिवार होता. शर्वील  आईविना पोरका झालेला आहे. तो सतत आईची आठवण काढत असतो. त्याचे मन कुठल्याही गोष्टीत रमत नसल्याने त्याला नागपूरला नेण्यात आले. 

आनंदवन पूर्वपदावर येत असले तरी कोणच्याही चेहऱ्यावर आनंद दिसला नाही. सारे काही संपल्यागत आनंदवनातील मंडळी आपापली कामे करताना दिसून आली. आनंदवनात नीरव शांतता बघायला मिळाली.

टॅग्स :Dr Sheetal Amteडॉ शीतल आमटे