'प्राधिकृत अधिकारी' नेमण्यासाठी डॉ. रवींद्रपाल सिंगने सरकारला लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:50 IST2026-02-17T15:40:58+5:302026-02-17T15:50:54+5:30

Chandrapur : नागभीडातून सुरू झालेल्या किडनी प्रत्यारोपण प्रकरणातील तपासाला कायद्याची ढाल लावून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी डॉक्टरांना घेरण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी आता रणनीती बदलली आहे.

Dr. Ravindrapal Singh wrote a letter to the government to appoint an 'authorized officer' | 'प्राधिकृत अधिकारी' नेमण्यासाठी डॉ. रवींद्रपाल सिंगने सरकारला लिहिले पत्र

Dr. Ravindrapal Singh wrote a letter to the government to appoint an 'authorized officer'

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
नागभीडातून सुरू झालेल्या किडनी प्रत्यारोपण प्रकरणातील तपासाला कायद्याची ढाल लावून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी डॉक्टरांना घेरण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी आता रणनीती बदलली आहे. 'थोटा' (THOTA) कायद्याचा तांत्रिक पेच निर्माण करून तपासात खोडा घालणाऱ्या डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्या आव्हानानंतर, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी राज्य सरकारकडे एसआयटीला 'प्राधिकृत अधिकारी' नेमण्यासाठी शनिवारी विशेष पत्र पाठवले. या पत्रामुळे एसआयटीला या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी कायदेशीर 'ब्रह्मास्त्र' मिळणार आहे.

त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. राजरत्नम गोविंदसामी आणि डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्या अटकेच्या हालचाली सुरू असतानाच, आरोपींच्या वकिलांनी 'मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा' (थोटा) मधील कलम २२ चा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. जोपर्यंत शासन नियुक्त प्राधिकरण तक्रार करत नाही, तोपर्यंत न्यायालयाला दखल घेता येणार नाही, तसेच पोलिसांना तपासही करता येत नाही असा दावा करण्यात आला. पोलिसांचे हात बांधण्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी राज्य सरकारकडून तातडीने अधिकारांची मागणी केली आहे. पुढील ४८ तासांत हे अधिकार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

डॉ. सिंगपुढे पोलिसांची ५५ प्रश्नांची लेखी प्रश्नावली

उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेवून डॉ. रवींद्रपाल सिंग चंद्रपूर तपासी अधिकाऱ्यांकडे दररोज हजेरी लावत आहे. मात्र, विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला 'आय डोन्ट रिमेंबर' असे उत्तर देऊन ते वेळकाढूपणा करत आहेत. पोलिसांकडे आजपर्यंतच्या उपलब्ध पुराव्याबाबत तसेच मोबाईलधील डाटावरून ५५ प्रश्नांची एक प्रश्नावली तयार करून लेखी उत्तर मागितले आहे. यातही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याची माहिती आहे. हा सर्व अहवाल पोलिस न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती आहे.

जामीन होताच 'त्या' सावकाराला पुन्हा बेड्या

  • रोशन कुळे प्रकरणात अटकेत असलेला सावकार लक्ष्मण उरकुडे याला जामीन मिळताच तो सुटकेचा निःश्वास टाकणार, तोच ब्रह्मपुरी पोलिसांनी त्याला दुसऱ्या गुन्ह्यात उचलले.
  • राजकुमार बावणे यांच्याकडून आठ लाखांच्या बदल्यात तब्बल ३१ लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोप उरकुडेवर आहे. जामीन मिळून बाहेर येताच पुन्हा बेड्या पडल्याने सावकार गोटात खळबळ उडाली आहे.

Web Title : डॉ. सिंह ने किडनी घोटाले की जांच में 'प्राधिकृत अधिकारी' नियुक्ति हेतु लिखा पत्र।

Web Summary : चंद्रपुर पुलिस ने डॉ. रवींद्रपाल सिंह से जुड़े किडनी प्रत्यारोपण रैकेट की जांच में कानूनी बाधाओं को दूर करने के लिए सरकार से 'प्राधिकृत अधिकारी' नियुक्त करने का अनुरोध किया है। इस कदम का उद्देश्य एसआईटी को डॉ. सिंह द्वारा कानूनी तकनीकीताओं का हवाला देते हुए जांच को चुनौती देने के बाद अवैध नेटवर्क का पर्दाफाश करने के लिए सशक्त बनाना है। एक साहूकार को जमानत मिलने के बाद फिर गिरफ्तार किया गया।

Web Title : Dr. Singh's Letter Seeks 'Authorized Officer' Appointment in Kidney Scam Probe.

Web Summary : Chandrapur police seek government-appointed 'Authorized Officer' to overcome legal hurdles in the kidney transplant racket investigation involving Dr. Ravindrapal Singh. This move aims to empower the SIT to effectively expose the illegal network after Dr. Singh challenged the investigation, citing legal technicalities. A loan shark was re-arrested after getting bail.