शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून डाॅ. शीतल आमटेंच्या मृत्यूमागील धाग्यादोऱ्यांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST

चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात, महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांचा मृत्यू नेमका कशाने झाला ...

चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात, महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे शोधण्यातच पोलिसांचा वेळ जात आहे. ही बाब न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न होईपर्यंत पोलिसांनी तपासाची दिशा बदलत मृत्यूमागील नेमक्या कारणांचाही शोध घेणे सुरू केले आहे.

डाॅ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी बोलले जात आहे. यासाठी पोलिसांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाची वाट पहावी लागत आहे. हा अहवाल केव्हा प्राप्त होईल, याबाबत पोलीसही अनभिज्ञ आहे. तो अहवाल जलदगतीने प्राप्त व्हावा म्हणून स्वत: पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी प्रयोगशाळा प्रमुखांना पत्र दिले आहे.

डाॅ. शीतल यांचा मृत्यू नैसर्गिक नाही, ही बाब स्पष्ट आहे. मग डाॅ. शीतल यांच्या मृत्यूमागे घातपात आहे वा त्यांनी आत्महत्या केली. या मागील कारणांचा छडाही पोलिसांना लावायचा आहे. पोलिसांनी या दिशेने तपास वळविला असल्याचे समजते. डाॅ. शीतल आमटे या मानसिक तणावात होत्या, ही बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली असल्याचे पोलीस सूत्राचे म्हणणे आहे. या मानसिक तणावाचे काय कारण होते, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आनंदनातील काही जणांचे जबाब नोंदविले आहे. मृत्यूला कौटुंबीक कलह कारणीभूत आहे का, या दिशेनेही शोध सुरू आहे. यासाठी आमटे कुटुंबीयांचे जबाबही पोलीस नोंदविणार आहे. तत्पूर्वी डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांचा उलगडा होण्याची पोलिसांना वाट आहे.

गरज भासल्यास आमटे कुटुंबीयांची विचारपूस

पाेलीस सूत्रानुसार, डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागे थेट कौंटुबिक कलहाचे कारण जोडता येत नाही. डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूच्या आठ-दहा दिवसांपूर्वीपर्यंत आमटे कुटुंबीय डाॅ. शीतल यांच्या संपर्कात नव्हते. तेव्हा आमटे कुटुंबीयांना या घटनेशी थेट जोडता येत नाही. यामुळे आधी मृत्यूच्या कारणांचा उलगडा होईल. त्यानंतर दरम्यानच्या काळातील घडलेला घटनाक्रम शोधला जाईल. गरज भासल्यास आमटे कुटुंबीयांची विचारपूस केली जाईल.

करजगी कुटुंबीयांच्या बयाणांबाबत गोपनीयता

घटनेच्या दिवशी पती गौतम करजगी हे घरी आले तेव्हा त्यांनी डाॅ. शीतल यांना आवाज दिला. मात्र प्रतिसाद मिळाला. त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला असता दाराची कडी आतुन लावलेली होती. गौतम करजगी यांनी अखेर दार उघडले. तेव्हा डाॅ. शीतल खोलीमध्ये बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांनी आनंदवनमधील रुग्णवाहिकेतून थेट उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या घटनाक्रमाबाबत पोलिसांनी करजगी कुटुंबीयांचे जबाब नोंदविलेले आहे. यामध्ये काय पुढे आले, ही बाब पोलिसांनी गोपनीय ठेवली आहे.