शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

30 पटीने वाढला जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात पहिला रुग्ण २ मे २०२० रोजी आढळून आला होता. त्यानंतर रुग्णसंख्या वाढीस लागली. परंतु, प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत रुग्णसंख्या घटली होती. परंतु पुन्हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढीस लागली आहे. 

ठळक मुद्देधोका वाढतोय : सर्वांनी काळजी घेणे गरजेचे, नियम पाळणे आवश्यक

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी जानेवारी २०२१ मध्ये असलेला जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये ३० पट वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा २.९५ होता, तर तो आता चक्क ३२ झाला आहे. त्यामुळे धोका वाढला असून, नागरिकांनी स्वत:ला जपणे गरजेचे झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पहिला रुग्ण २ मे २०२० रोजी आढळून आला होता. त्यानंतर रुग्णसंख्या वाढीस लागली. परंतु, प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत रुग्णसंख्या घटली होती. परंतु पुन्हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढीस लागली आहे. जानेवारी २०२१ मध्ये जिल्ह्याचा पाझिटिव्ही रेट हा २.९५ होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातील ४. २० झाला. एप्रिल महिन्यात तर पॉझिटिव्हिटी रेट ३२ वर पोहोचला आहे. तपासणी करणाऱ्यांमध्ये बहुतांश जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे हा संसर्ग किती वेगाने वाढत आहे याचा अंदाज येतो. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ५१ हजारांवर पोहोचली आहे, तर १४ हजारांच्या वर सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरीही आरोग्य यंत्रणा आहे तेवढ्या सुविधा व मनुष्यबळावर ताकदीने काम करीत आहे. 

डेथ रेटमध्येही झाली वाढसप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाबाधित मृतकांची संख्या अल्प होती, मात्र आता दररोज २५ च्या वर रुग्णांचा मृत्यू होत आहे. मार्च २०२१ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा डेथ रेट ०.६९ होता. आता त्यामध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याचा डेथ रेट १.४६ वर पोहोचला आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. 

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या चिंताजनकआजपर्यंत शहरी भागातच कोरोना पसरला होता, मात्र आता याचे लोण ग्रामीण भागातही पसरले आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५१ हजारांवर पोहोचली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णसंख्या १८ हजारांच्या वर आहे. बहुतांश ठिकाणी एकाला बाधा झाली तरी त्यांच्या कुटुंबातील इतर लोकही पॉझिटिव्ह येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विविध कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांनी घरी गेल्यानंतर पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. 

जानेवारी महिन्यात चंद्रपूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.९५ होता. आता तो ३२ वर पोहोचला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली असून, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा नियमित वापर करावा, सॅनिटायझरने सतत हात स्वच्छ धुवावे.डॉ. सुधीर मेश्राम, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या