शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा शिवसेनेत खांदेपालट

By admin | Updated: April 24, 2015 00:59 IST

शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यासाठी मागील अनेक दिवसांपापासून सुरू असलेल्या हालचालींना गुरूवारी अखेर पूर्णविराम मिळाला.

चंद्रपूर : शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यासाठी मागील अनेक दिवसांपापासून सुरू असलेल्या हालचालींना गुरूवारी अखेर पूर्णविराम मिळाला. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केलेल्या घोषणेनुसार, नवे जिल्हाप्रमुख म्हणून अनिल धानोरकर आणि सतीश भीवगडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या सोबतच आमदार बाळू धानोरकर यांच्याकडे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा संघटक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणुकांपासून शिवसेनेच्या जिल्हा नेतृत्वात फेरबदल करण्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यासाठी अनेकजण इच्छुक होते. अनेकांी यासाठी मुंबईत वाऱ्याही केल्या होत्या. मागील महिन्यात उद्धव ठाकरे चंद्रपुरात आले असता अनेकांनी आपल्या नावांची लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपातून शिवसेनेत प्रवेशलेले किशोर जोरगेवार हे सुद्धा इच्छूक होते. त्यांच्यासाठी मातोश्रीवर मोठ्या प्रमाणात नाव चालविण्यात आले. शिवसेनेचे जुने नेते दिलीप कपूरही इच्छुकांच्या रांगेत होते. मात्र या नावांना डावलून उद्धव ठाकरे यांनी दोन्ही नवीन नावांना प्राधान्य दिल्याची माहिती आहे.धानोरकरांचे वर्चस्वनव्या कार्यकारिणीमध्ये आमदार बाळू धानोरकर यांचे वर्चस्व राहण्याची अधिक शक्यता आहे. मुंबईतून जाहीर झालेल्या नावांमध्ये जिल्हाप्रमुख म्हणून निवड झालेले अनिल धानोरकर हे बाळू धानोरकर यांचे बंधू असून भद्रावती नगर पालिकेचे नगराध्यक्ष आहेत. तर लोकसभेची जबाबदारी खुद्द बाळू धानोरकर यांच्याकडे आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)