शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गुरूजींच्या गैरहजेरीवर जिल्हा परिषद पदाधिकारी भडकले

By admin | Updated: December 24, 2015 00:57 IST

अध्यापन व शैक्षणिक कार्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊनच राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित राहावे,

सभा गाजली : राष्ट्रीय अधिवेशनासाठी १ हजार ८१९ शिक्षकांची हजेरी चंद्रपूर : अध्यापन व शैक्षणिक कार्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊनच राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित राहावे, असे शासनाचे परिपत्रक असताना जिल्ह्यातील तब्बल १ हजार ८१९ शिक्षक अधिवेशनाच्या नावावर शाळेत गैरहजर राहिले. त्यामुळे गेल्या १३ डिसेंबरपासून अनेक जिल्हा परिषद शाळा शिक्षकाविना ओस पडल्या आहेत. याची दखल घेत बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी शिक्षकांवर कारवाईच्या मागणीसाठी चांगलाच गोंधळ घातला.१४ ते २३ डिसेंबर दरम्यान बंगळूरू येथे प्राथमिक शिक्षकांचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने परिपत्र काढून अध्यापन व शैक्षणिक कामांवर परिणाम होणार नाही, याची दखल घेण्याचे म्हटले होते. मात्र अनेक शिक्षकांनी शैक्षणिक कामे व अध्यापनाचा विचार न करता रजेचा अर्ज टाकून गायब झाले. मात्र यापैकी अनेक शिक्षक अधिवेशनाच्या नावावर घरीच दिसले. अधिवेनशनासाठी जाणाऱ्या शिक्षकांना १४ ते २३ डिसेंबर दरम्यान नैमित्तीक रजा मंजूर केल्याचे ऐकविण्यात आले होते. मात्र ज्यांना नैमित्तीक रजा मंजूर झाली नाही, त्यांनीही अधिवेशनाची वाट धरली. त्यामुळे दोन शिक्षकी शाळेत केवळ एकाच शिक्षकाला चार वर्गाचा भार सांभाळण्याची वेळ आली. शिक्षकांनी केवळ अधिवेशनाचे निमित्त करुन विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्याने शालेय अभ्यासक्रमासह अनेक शैक्षणिक कामांवर परिणाम झाला आहे, हा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव व ब्रिजभूषण पाझारे यांनी सभेत लावून धरला. शिक्षण, समाजकल्याण व स्थायी समितीच्या या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरूनुले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध पुरवठा व समाजकल्याण विभागातर्फे अनुदानावर पाईप वाटप करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)