शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

इमारत नूतनीकरणावर जिल्हा निधीचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2016 01:22 IST

जिल्ह्यातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. मदतीसाठी शेतकऱ्यांचा टाहो सुरू आहे.

दुष्काळात तेरावा महिना : सदस्यांना विकास कामांसाठी निधीच नाहीमंगेश भांडेकर चंद्रपूरजिल्ह्यातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. मदतीसाठी शेतकऱ्यांचा टाहो सुरू आहे. शासनाच्या योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून तसेच नव्या योजना राबवून त्यांना दिलासा देण्याची सध्या गरज आहे. मात्र जिल्हा परिषदेचे सत्ताधारी सध्या आपली निवासस्थाने व कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात व्यस्त आहेत. विशेष म्हणजे, हे नूतनीकरण जिल्हा निधीतून होत आहे. जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या क्षेत्रात विकास कामांसाठी दिला जाणारा निधी इमारत नूतनीकरणावर खर्च होत असल्याने हा प्रकार म्हणजे निधीचा चुराडा व दुष्काळात तेरावा महिना असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे. जिल्हा परिषद कार्यालयातील तळ मजला व पहिल्या माळ्याचे नूतनीकरण करण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे. तळ मजल्यावर असलेले अधिकाऱ्यांच्या कक्षांना टाईल्स लागल्याने चमक आली आहे. पहिल्या माळ्यावरील पदाधिकाऱ्यांच्या कक्षांनाही टाईल्स लावण्याचे काम सुरू असून हे काम प्रगतिपथावर आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार व संरक्षन भिंतीचेही काम प्रगतिपथावर आहे. या कामांसाठी तब्बल १ कोटी १५ लाखांचा खर्च येणार असल्याची माहिती आहे. मात्र हा खर्च जिल्हा निधीतून केला जात असल्याने जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या क्षेत्रात नाली बांधकाम, रस्ते, रंगमंच बांधकामासाठी दिला जाणारा तीन ते चार लाखांच्या निधीपासून मुकावे लागले आहे. जिल्हा निधीतून प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांना तीन ते चार लाख रूपये त्यांच्या क्षेत्रात विकास कामे करण्यासाठी दिले जातात. मात्र या जिल्हा निधीचा जिल्हा मुख्यालय चंद्रपुरातच चुराडा होत असल्याचे अनेक सदस्यांचे म्हणणे आहे. तर पदाधिकाऱ्यांची याबाबत विचारणा केली असता, काहींनी जिल्हा निधी तर काहींनी तेरावा वित्त आयोग निधीतून ही कामे सुरू असल्याचे सांगितले.