शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवलेला आहे. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाची तसेच मतदाराच्या आकडेवारीविषयीची माहिती दिली.

ठळक मुद्देकुणाल खेमनार । जिल्ह्यात १८ लाख ७२ हजार मतदारांची नोंदणी, २७ पर्यंत प्रक्रिया सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत १८ लाख ७२ हजार ७८७ मतदारांची नोंदणी झालेली असून २७ सप्टेंबरपर्यंत उर्वरित नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करता येईल. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूरचे ६४ टक्के मतदान झाले होते. ही टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवलेला आहे. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाची तसेच मतदाराच्या आकडेवारीविषयीची माहिती दिली. यामध्ये जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून यांची एकूण मतदार संख्या १८ लक्ष ७२ हजार ७८७ मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये नऊ लाख ११ हजार ९३८ महिला मतदार असून नऊ लाख ६० हजार ८२७ पुरुष मतदार आहेत. तर २२ इतर मतदार असून एकूण मतदारांपैकी १७०९ मतदार सेनादलातील आहे. २७ सप्टेंबरपर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार असून उर्वरित मतदारांना नमुना ६ अर्ज भरून मतदार म्हणून नोंदणी करता येईल.दरम्यान, या पार्श्वभूमीवर कुणीही आचारसंहिता भंग करू नये, असे आवाहनही ङॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी केले.जिल्ह्यात २०९८ मतदान केंद्रजिल्ह्यात सध्या २०९८ मतदान केंद्र असून यातील २८ मतदान केंद्रे सहाय्यक मतदान केंद्र म्हणून निर्माण केले गेले आहे. प्रत्येक मतदार संघात दोन मतदान केंद्र महिला संचलित मतदान केंद्र म्हणून तर एक मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. मतदान यंत्रांची सुरक्षा वाढवण्यात आली असून यंत्राच्या वाहतुकीदरम्यान जीपीएस ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चार हजार पोलीस कर्मचारी तसेच केंद्रीय सुरक्षा दलाचे पोलीस तैनात करण्यात येईल. तसेच संवेदनशील मतदान केंद्रावर सुरक्षा वाढविण्यात येणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा