शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाला पडला ‘नो व्हेईकल डे’ चा विसर

By admin | Updated: December 22, 2016 01:43 IST

प्रदूषणातून मुक्ती मिळविण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारला ‘नो व्हेईकल डे’(वाहनविरहित दिवस) पाळण्याचा निर्णय

नागरिक निरुत्साही : अल्पकालावधीतच उपक्रम पडला बंद परिमल डोहणे  चंद्रपूर प्रदूषणातून मुक्ती मिळविण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारला ‘नो व्हेईकल डे’(वाहनविरहित दिवस) पाळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या घेतला होता. त्यावेळी अनेक मोठ्या अधिकाऱ्यांपासून सामान्य नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. मात्र अल्प कालावधीतच प्रशासनाला या मोहिमेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये प्रदुषणात चंद्रपूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. यावर अंकुश घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १४ डिसेंबर २०१५ पासून प्रत्येक महिन्यांच्या दुसऱ्या सोमवारला ‘नो व्हेईकल डे’ (वाहन विरहित दिवसाचा) संकल्प केला. त्यानूसार पेट्रोल, डिजेलवर चालणाऱ्या वाहनांचा प्रवास टाळून प्रत्येकाने महिन्याच्या दुसऱ्या सोमवारला पायदळ अथवा सायकलने प्रवास करण्याचा संकल्प केला. काही दिवस ही संकल्पना सुरळीत चालली. मात्र अल्प कालावधीतच प्रशासनासोबतच सामान्य नागरिकांनासुद्धा नो व्हेईकल डे चा विसर पडल्याचे दिसून येत आहे. ‘नो व्हेईकल डे’ ची संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक म्हैसकर यांच्या पुढाकाराने सुरुवात करण्यात आली होती. त्यासोबतच विविध प्रभागाचे अधिकारी, पर्यावरणवादी तसेच सामान्य नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या मोहिमेसाठी पुढाकार घेतला होता. याबाबत जनजागृती करण्यासाठी १४ डिसेंबर २०१५ ला गांधी चौकातून आझाद बाग, जटपूरा गेट या मुख्य मार्गाद्वारे सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी अनेकजण सायकलने आपले कार्यालय गाठले.तसेच सदर विषयावर परिसंवादाचे आयोजनसुद्धा करण्यात आले होते. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर वाहनाची संख्या वाढत आहे. वाहनातून निघणाऱ्या धुरांमुळे वायु प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना श्वसनासंबंधीचे रोग होत आहेत. त्यावर आढा घालण्यासाठी सदर योजनेला सुरुवात करण्यात आली होती. पण अल्पकालावधीतच प्रशासनाला या मोहिमेचा विसर पडला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बंद पडलेला उपक्रम पुनश्च सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.