शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शिवशाही एसी स्लीपर बसच्या तिकीट दरात सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 22:38 IST

राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी एसटीने एसी स्लीपर शिवशाही बसेस सुरू केल्या. परंतु, जास्त तिकीट दरामुळे प्रवाशांनी शिवशाहीकडे पाठ फिरवली. परिणामी प्रवाशांना शिवशाहीकडे आकर्षित करण्यासाठी तिकीट दर कमी करण्यात आलेले आहेत. १५.२० रुपये प्रति टप्प्यावरुन ११.३५ रुपये प्रति टप्पा करण्यात आला असून ही दरकपात १३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना दिलासा : प्रति टप्पा १५.२० रुपयांवरुन ११.३५ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी एसटीने एसी स्लीपर शिवशाही बसेस सुरू केल्या. परंतु, जास्त तिकीट दरामुळे प्रवाशांनी शिवशाहीकडे पाठ फिरवली. परिणामी प्रवाशांना शिवशाहीकडे आकर्षित करण्यासाठी तिकीट दर कमी करण्यात आलेले आहेत. १५.२० रुपये प्रति टप्प्यावरुन ११.३५ रुपये प्रति टप्पा करण्यात आला असून ही दरकपात १३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत स्लीपर एसी शिवशाहीचे तिकीट जास्त असल्यामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरविली होती. चंद्रपूर डेपोवरुन औरंगाबादकरिता शिवशाही एसी स्लीपर कोच बस धावते. पूर्वी मंडळाकडून प्रति सहा किलोमिटरचा एक टप्पा १५.२० पैसे आकारण्यात येत होता. त्यामुळे चंद्रपूरवरुन औरंगाबादकडे धावणाऱ्या शिवशाही एसी स्लिपरची तिकीट १६७० रुपये होती. मात्र आता यामध्ये कपात करुन प्रति टप्पा ११.३५ पैसे आकारण्यात येणार असल्याने औरंगाबादकरिता १२५० रुपये प्रवास भाडे पडणार आहे. तर पूर्वी जालणा १४९५ आता ११०५, खामगाव ११३० आता ८३५, अकोला ९९०-७२५, अमरावती ७३५-५३५, वर्धा ४१५-३१० रुपये प्रवास भाडे कमी करण्यात आले आहे.एसी शिवशाही स्लीपर बसमध्ये जेष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये ३० टक्के सवलत यापूर्वीच देण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट दरातील कपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांच्या बरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार असल्यामुळे प्रवाशांनी सुरक्षित, आरामदायी व शयनयान प्रवासासाठी एसटीच्या एसी शिवशाही शयनयान बसचा वापर करावा, असे आवाहन चंद्रपूर एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक सचिन डफळे व सहाय्यक वाहतूक निरिक्षक नागपूरे यांनी केले आहे.सिटींग बसचे प्रवासदर कमी करामहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १३ फेब्रुवारीपासून एसटीच्या शिवशाहीच्या एसी स्लीपर बसची तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शिवशाही सिटींग बसचे दर अजूनही कमी केले नाही. चंद्रपुरातून नागपूरसाठी अनेक शिवशाही सिटींग बस धावातात. मात्र या बसची तिकिट २९० रुपये आकारण्यात येत असल्याने प्रवाश्यांनी या बसकडे पाठ फिरवली आहे. याउलट खासगी एसी टॅव्हल्स केवळ २०० रुपये दर आकारते. परिणामी प्रवासी खासगी वाहनाचा वापर करतात. त्यामुळे शिवशाही सिटींग बसचे दर कमी करावे, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.