शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

शासनाविरोधात असंतोष रस्त्यावर

By admin | Updated: April 24, 2015 01:02 IST

राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सतत एक महिना लढा देऊन जी मानधन वाढ मिळविली, ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न भाजपा शासनाने चालविला आहे.

चंद्रपूर : राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सतत एक महिना लढा देऊन जी मानधन वाढ मिळविली, ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न भाजपा शासनाने चालविला आहे. त्याच्या निषेधार्थ शहरी प्रकल्पातील शेकडो अंगणवाडी सेविकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन आपला रोष व्यक्त केला.अंगणवाडी सेविकांना बऱ्याच संघर्षानंतर काँग्रेस शासनाने मानधनात वाढ केली. मात्र नवीन आलेल्या भाजपा सरकार ही मानधनवाढ रद्द करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा निषेध करण्याकरिता अंगणवाडी सेविकांना हा मोर्चा काढला. भाजपा शासनाचा धिक्कार असो, १ एप्रिल २०१४ पासून मानधन वाढ मिळालीच पाहिजे, दिवाळी भेट मिळलीच पाहिजे, भूमीअधिग्रहण कायद्याचा धिक्कार असो, सर्वांना ३५ किलो धान्य मिळालेच पाहिजे, साठ वर्षावरील वृद्धांना पेंशन मिळालीच पाहिजे, फसव्या घोषणा देणे बंद करा आदी घोषणा देण्यात आल्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर तिथे सभा घेण्यात आली. यावेळी संध्या खनके म्हणाल्या, १ एप्रिल २०१४ पासून मिळालेली मानधन वाढ ही काही तत्कालीन सरकारची मेहरबानी नाही. रस्त्यावर येऊन लढा देऊन ती आम्ही मिळविली आहे. ‘अच्छे दिन’च्या नावाखाली निवडून आलेले भाजपा सरकार म्हणते ही वाढ आम्हाला मान्य नाही. ९५० आणि मदतनीसला ५०० रुपयांची वाढ १ एप्रिल २०१५ पासून देतो, या निर्णयाचा आम्हाला विरोध असून तो निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा. शारदा लेनगुरे यांनीदेखील शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला. प्रा. दहीवडे म्हणाले, अच्छे दिनचा फुगा आता पुर्णत: फुटला आहे. अंगणवाडी सेविकाच नव्हे तर कामगार, शेतकरी, शेतमजूर सारेच रस्त्यावर उतरले असून केवळ या देशाच्या बड्या भांडवलदारांना भाजपाला आणि त्यांच्या नेत्याला डोक्यावर घेऊन नाचत आहे. त्यांची निती आणि त्यांचे धोरण असेच राहिले तर या देशाची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असा इशारा दहीवडे यांनी दिला. आशा नाखले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटण्यास गेले व मागण्याचे निवेदन सादर केले. धरणा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पवित्रा ताकसांडे, राधा सुंकरवार, वंदना मुळे, रेखा रामटेके, वैशाली बोकारे, माया कासट्टीवार आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)