शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

शिस्तभंग कारभारावर लागणार अंकुश

By admin | Updated: April 2, 2015 01:24 IST

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांत सुरू असलेल्या शिस्तभंग कारभारावर अंकूश घालण्यासाठी विभागीय सहनिबंधक (प्रशासक) ..

चंद्रपूर : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांत सुरू असलेल्या शिस्तभंग कारभारावर अंकूश घालण्यासाठी विभागीय सहनिबंधक (प्रशासक) यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याचा निर्णय पणन संचालनालयाने घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून बाजार समित्यांचे लेखा परिक्षण होणार असून यासाठी मार्गदर्शक तत्वे व नियमावली पणन संचालनालयाने जारी केली आहे. राज्यभरातील बाजार समित्यांची ढेपाळलेली आर्थिक शिस्त अधिक पारदर्शक करण्यासाठी पणन संचालनालयाने हे ठोस पाऊल उचलले आहे. अनेक बाजार समित्या लेखा परिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. तर लेखा परीक्षणावरील दोष दुरूस्ती अहवाल सादर करीत नाहीत. यामुळे बाजार समित्यांच्या आर्थिक कारभारावर अंकुश ठेवणे कठीण झाले आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्या लेखा परीक्षणासाठी विभागीय सहनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना होणार आहे. पणन संचालकांनी नुकताच आढावा घेतला. यामध्ये चंद्रपूरसह राज्यभरातील ३०५ बाजार समित्यांपैकी ७८ बाजार समित्यांचे लेखापरीक्षण झाले नसल्याची बाब समोर आली. तर अनेक बाजार समित्यांनी लेखापरीक्षण अहवाल पणन संचालनालयाला सादर केलेला नाहीत. तसेच अनेक बाजार समित्यांनी लेखापरीक्षण अहवालात निघालेल्या दोषांची दुरूस्ती केलेली नाही. त्यामुळे पणन संचालकांनी लेखा परीक्षणासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. लेखापरीक्षणात गंभीर बाबी आढळून आल्यास त्याचा सविस्तर विशेष अहवाल प्रशासकीय कारवाईसाठी विशेष लेखापरीक्षकांच्या मार्फत पणन संचालक व जिल्हा उपनिबंधक यांना सादर करावे लागणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)अशी आहे नियमावली जिल्हा उपनिबंधकांनी नोंदणीकृत बाजार समित्यांची यादी लेखा परीक्षकांच्या यादीसह ५ एप्रिलपर्र्यंत पाठविणे बंधनकारक आहे. विभागीय सहनिबंधकांच्या (प्रशासन) समितीने यादी अंतिम करून मंजुरीसाठी पणन संचालकांकडे पाठविणे. पणन संचालक यादीला मंजुरी देऊन संबंधित जिल्हा उपनिबंधक आणि विशेष लेखापरीक्षकांना आदेश देतील, एकाच बाजार समितीचे सलग ३ वेळा लेखापरीक्षण केलेल्या लेखापरीक्षकाला पुन्हा त्याच बाजार समितीचे लेखापरीक्षण करता येणार नाही. थकीत कालावधीपासून अद्ययावत काळापर्र्यंत लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. लेखापरीक्षकाने लेखापरिक्षण पूर्ण केल्यानंतर १५ दिवसाच्या आत पाच प्रतिमध्ये पणन संचालक जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरिक्षक यांना सादर करणे आवश्यक आहे.बाजार समित्यांना लेखा परीक्षणावरील दोष दुरूस्ती अहवाल तीन महिन्याच्या आत शासकीय लेखापरीक्षकांनी सादर करावा. संबंधीत लेखापरीक्षकांनी दोष दुरूस्तीवर आपले अभिप्राय नोंदवून तो अहवाल विशेष लेखापरीक्षकांमार्फत पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधकांना सादर करावा. दोष दुरूस्ती अहवालातील असमाधानकारक दोष दुरूस्तीचे मुद्दे एक महिन्यात संबंधीत बाजार समितीला कळविण्याची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांना पूर्ण करावी लागणार आहे. त्याची एक प्रत पणन संचालकांना सादर करावी लागणार आहे.