शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

मोफत प्रवासाच्या सवलतीपासून सिकलसेल रुग्ण वंचित

By admin | Updated: June 8, 2015 01:57 IST

सिकलसेलग्रस्त रुग्णांना आवश्यक वैद्यकीय तपासणी व औषधोपचाराकरिता त्यांच्या निवासी गावापासून ग्रामीण रुग्णालय,

शासननिर्णय तीन महिन्यापूर्वी : परिवहन मंडळाला पत्रच नाहीभद्रावती : सिकलसेलग्रस्त रुग्णांना आवश्यक वैद्यकीय तपासणी व औषधोपचाराकरिता त्यांच्या निवासी गावापासून ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये प्रवास करण्यासाठी एका मदतनिसासह मोफत एस.टी. प्रवास सवलत देण्याबाबत १० मार्च २०१५ ला शासनाने निर्णय घेतला. शासन निर्णय होऊन तीन महिने झाले. परंतु अजूनही मोफत एस.टी. प्रवासाची सवलत सिकलसेलग्रस्त रुग्णांना लागू झालेली नाही. त्यामुळे सिकलसेल रुग्णांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण पसरली आहे.महाराष्ट्रात जवळपास दोन लाख ५० हजार सिकलसेलग्रस्त रुग्ण आहे. त्यापैकी सर्वात जास्त रुग्ण एकट्या विदर्भात आहेत. सिकलसेलग्रस्तांना नियमितपणे रक्त तपासण्यासाठी जावे लागते. आर्थिक परिस्थिती खराब असलेल्याने रुग्ण नियमितपणे रक्त तपासण्यास जावू शकत नाही. मोफत एस.टी. प्रवास सवलत देण्याबाबत शासनाचा जी.आर. निघाला. परंतु प्रत्यक्षात सवलत सुरू झाली नाही. चंद्रपूर येथील परिवहन मंडळाच्या विभागीय कार्यालयात याबाबत विचारणा केली असता शासनाचे यासंबंधित पत्र आमच्याकडे आलेच नाही. पत्र आल्यावर याबाबत कळवू, असे संबंधित अधिकाऱ्यांत सांगितल्याचे भद्रावती येथील सिकलग्रस्तरुग्ण वैद्य यांनी सांगितले.नुकत्याच नागपूर येथे झालेल्या समाधान शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पाच मागण्यांचे निवेदन दिल्याचे सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी सांगितले. मोफत एस.टी. बाबतचा जी.आर. १० मार्च २०१५ चा आहे. याची मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत आहे. यासाठी १५.११ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहे. परंतु आजतागायत ही सवलत सुरू झालेली नाही. लोकप्रतिनिधींनी याबाबत विचारणा करावी, अशी मागणीही रामटेके यांनी केली आहे.तसेच १८ वर्षाच्या खालील मुलांना याबाबत जास्त त्रास होता. बाल हक्क सुरक्षा आयोगाकडून अशा मुलांची काळजी घेतल्या गेली पाहिजे. महाराष्ट्र राज्य सिकलसेल नियंत्रण व उपचार कायदा बनविण्यात यावा, असा कायदा अमेरिकेत आहे. राज्यात राज्यस्तरीय समन्वय समिती नेमल्या गेली पाहिजे. इत्यादी मागण्यांचे निवेदन रामटेके यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. सिकलसेलग्रस्तांच्या समस्यांना चंद्रपूर जिल्ह्यानेच वाचा फोडली. ना. अहीर व ना. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने राज्याच्या १४ व केंद्राच्या ५ मागण्या सिकलकग्रस्त रुग्णांसाठी मान्य झाल्या, असे रामटेके यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)