शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी सजली

By admin | Updated: October 13, 2014 23:32 IST

येथील पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला १५ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. दोन दिवशीय सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक,

चंद्रपूर : येथील पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला १५ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. दोन दिवशीय सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक, साहित्यिक, देश-विदेशातील अभ्यासकांचे प्रबोधन यावेळी होणार आहे. यासाठी येथील दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. समारंभस्थळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिचे जतन केलेला अस्थिकलश दर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे. बुद्धधम्म प्रचारकांकडून धम्ममय आनंदाची रुजवण, जगविख्यात बुद्धधम्म प्रचारकांकडून धम्म श्रवण, धम्मसंबंधित उपयुक्त वस्तुंचे स्टॉल, बोधीवृक्षाचे दर्शन हे या समारंभाचे खास वैशिष्ट आहे. संपूर्ण दीक्षाभूमी परिसर रोषणाई करण्यात आली आहे. दीक्षाभूमीस्थळी तथागत गौतम बुद्ध व प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य छायाचित्र उभारण्यात आले आहे. या समारंभाची जवळपास पूर्ण तयारी झाली आहे. येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभादरम्यान १५ आॅक्टोबरला सायंकाळी ६.३० वाजता वाहनासह मिरवणूक निघेल. १६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिकलशासह मिरवणूक निघणार आहे. यात बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण घोटेकर, सचिव वामनराव मोडक, उपाध्यक्ष अशोक घोटेकर तथा सदस्यांनी केली आहे. १५ आॅक्टोबरला निवडणूक असल्याने यावर्षी सायंकाळी ६.३० नंतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.(नगर प्रतिनिधी)