ब्रह्मपुरीत धन्वंतरी जयंती साजरी

By Admin | Updated: November 18, 2015 01:10 IST2015-11-18T01:10:05+5:302015-11-18T01:10:05+5:30

नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन शाखा ब्रह्मपुरीच्यावतीने रविवारी धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला.

Dhanvantari Jayanti celebrated in Brahmapuri | ब्रह्मपुरीत धन्वंतरी जयंती साजरी

ब्रह्मपुरीत धन्वंतरी जयंती साजरी


ब्रह्मपुरी : नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन शाखा ब्रह्मपुरीच्यावतीने रविवारी धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. याच कार्यक्रमात शल्यचिकित्सक डॉ.अतुल नागरे यांचा निमाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मंचावर डॉ.प्रभुदास चिलबुले, डॉ.सोमेश्वर सहारे, योगतज्ज्ञ पालकर, डॉ.सुनील नाकाडे, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. निमा शाखेचे डॉ.रमेश नारिंगे, डॉ.सतीश कावळे, डॉ.रमेश कारवट, डॉ.सुनील नाकाडे यांच्या हस्ते डॉ.अतुल नागरे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.अपर्णा टेंभरे, प्रास्ताविक डॉ.नीता नखाते तर उपस्थितांचे आभार डॉ.नरेश देशमुख यांनी मानले.
कार्यक्रमासाठी सर्व पॅथीचे डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dhanvantari Jayanti celebrated in Brahmapuri