शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी क्षेत्रातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबध्द

By admin | Updated: October 11, 2014 01:29 IST

सामाजिक कार्य करीत असताना सावली तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून नेहमीच जाणे आहे. हा तालुका ३० वर्षांपासून जसा आहे तसाच आजही आहे.

चंद्रपूर : सामाजिक कार्य करीत असताना सावली तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून नेहमीच जाणे आहे. हा तालुका ३० वर्षांपासून जसा आहे तसाच आजही आहे. या तालुक्याच्या कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही. रस्त्याची अवस्था दयनीय आहे. लोकांच्या साध्या मुलभूत गरजा पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ब्रह्मपुरी क्षेत्रातील प्रत्येक गावाच्या चौफेर विकास करण्यासाठी आपल्याला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस पक्ष व पिरीपाचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी आज शुक्रवारी सावली तालुक्यातील विविध गावात प्रचार सभेदरम्यान केले. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले,, अच्छे दिन आने वाले है असा नारा देणाऱ्या मोदी सरकारने बुरे दिन दाखविणे सुरू केले आहे. फक्त उद्योगपतींना साथ देणाऱ्या मोदी सरकारला सामान्य मतदारांशी काहीही देणेघेणे नाही. विकासाच्या नावावर मते मागणारे लोकप्रतिनिधी क्षेत्राचा विकास करु शकले नाहीत, ही शोकांतिका आहे. त्यामुळे या क्षेत्राचा विकास करण्यासाठी आपल्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली असून आपणाला आशीर्वाद देऊन निवडून द्यावे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले.ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे अखिल भारतीय काँग्रेस पक्ष आणि पिरिपा आघाडीचे अधिकृत उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी सावली तालुक्यातील या परिसराचा दौरा केला. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, अ‍ॅड. रामभाऊ मेश्राम, बाला शुक्ला, आबिद भाई, राजू सिद्धम, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व जि.प. सदस्य दिनेश चिटनुरवार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा महासचिव प्रकाश पाटील रार्इंचवार, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)