शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू पसरविण्यास विभागच जबाबदार

By admin | Updated: June 5, 2014 23:55 IST

जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाची साथ असताना या गंभीर प्रकाराकडे जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकार्‍यांनी विशेषत: जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनी दुर्लक्ष केल्यामुळे

चौकशीची मागणी : हंसराज अहीर यांचा आरोपचंद्रपूर : जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाची साथ असताना या गंभीर प्रकाराकडे जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकार्‍यांनी विशेषत: जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनी दुर्लक्ष केल्यामुळे डेंग्यूच्या  रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या रुग्णांवर प्रभावी व वेळेवर उपचार न झाल्याने गोंडपिंपरी तालुक्यातील चार ते पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली. त्यामुळे या घटनेस जबाबदार असणार्‍या आरोग्य अधिकार्‍यांवर दोषारोप ठेवून कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार हंसराज अहीर यांनी केली आहे. डेंग्यूची मोठय़ा प्रमाणात लागण झालेल्या गोंडपिंपरी तालुक्यातील राळापेठ या गावास ३ जून रोजी भेट देऊन खासदार अहीर यांनी डेंग्यू प्रभावित रुग्णांची भेट घेऊन त्यांच्यावर होत असलेल्या उपचाराची चौकशी केली. यावेळी खासदार अहीर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या अक्षम्य व बेजबाबदार भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त करून आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांनी डेंग्यू व तापाच्या अन्य साथीची त्वरीत दखल घेऊन आरोग्य सुविधा वेळीच उपलब्ध करून दिल्या असत्या तर रुग्णांच्या संख्येत वृद्धी झाली नसती व काही रुग्णांना जीव गमवावा लागला नसता. या सार्‍या प्रकाराला आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीसुद्धा तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.गोंडपिंपरी तालुक्यात अनेक गावात डेंग्यूची साथ असतानाही स्थानिक उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने या गावात वेळीच आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी विलंब झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राळापेठ येथे डेंग्यूच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र मिळालेल्या माहितीनुसार जे रुग्ण खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले ते दगावल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. जे रुग्ण दगावले ते कोणत्या खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे उपचार करण्यात आले. या उपचारापोटी या रुग्णांकडून किती बिल आकारण्यात आले व दगावलेले रुग्ण नेमके कोण होते, या सर्व बाबींची चौकशी जिल्हा आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकार्‍यांनी जबाबदारीने करावी, अशी मागणीही खा. अहीर यांनी केली आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील धामणगाव येथे डेंग्यूसदृश तापाची साथ सुरू असून या ठिकाणी तातडीने आरोग्य शिबिराची व्यवस्था करून रुग्णांवर प्रभावीपणे उपचार करावे, अशा सूचनाही खा. अहीर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. या भेटीप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य संदीप करपे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)